सामंत विद्यालयात “पुस्तके येती भेटीला” पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन*

.

*सामंत विद्यालयात “पुस्तके येती भेटीला” पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन*

पर्वरी येथील प्रबोधन शिक्षण संस्था संचलित एल. डी. सामंत मेमोरियल विद्यालयात “पुस्तके येती भेटीला” या पुस्तक प्रदर्शन सप्ताहाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. विद्यार्थी व पालकांना शालेय वाचनालयातील सर्व पुस्तकांची माहिती व परिचय होऊन त्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत या उद्देशाने वाचनालयातील सर्व पुस्तकांचे प्रदर्शन या उपक्रमाअंतर्गत मांडण्यात आले आहे.

या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक हेराल्डचे कार्यकारी संपादक अवित बगळे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हाळसाकांत देशपांडे, ग्रंथपाल सज्जन फडते, ज्येष्ठ शिक्षिका ज्योती चिपळूणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या स्वागत गीताने झाली. म्हाळसाकांत देशपांडे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. तद्नंतर आपल्या भाषणात बोलताना अवित बगळे म्हणाले की, ” विद्यार्थ्यांनी गोव्यावर आधारित पुस्तके वाचण्याची गरज आहे. गोव्याचा निसर्ग, इतिहास, संस्कृती इत्यादीवर अनेक पुस्तके असून त्याचा परिचय विद्यार्थ्यांना वाचनातून होईल. तसेच विद्यार्थ्यांनी शालेय सहलीच्या माध्यमातून किंवा आपल्या पालकांसह गोव्यातील विविध स्थळांना भेट दिली पाहिजे.”

हे पुस्तक प्रदर्शन एक आठवडा सुरू असेल. त्याचा लाभ सर्व विद्यार्थी व पालकांनी करून घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक म्हाळसाकांत देशपांडे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोरी गावडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्या प्रबोधिनी अध्यापक महाविद्यालयाच्या छात्र प्रशिक्षणार्थी, कला शिक्षक मोहन खवणेकर, पुंडलिक पंडित, रश्मी कुडतरकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar