पोस्टल वर्कर डे चे औचित्य साधुन जायंटस् गृप ऑफ खौली सहेली फेडरेशन कौंसिल ने महिला पोस्टमन तनवी आकेरकर यांच्या त्याच्या सेवेबद्दल व प्रामाणिक सेवेबद्दल खौली म्हापसा येथे गौरव केला. जायंटस् गृप ऑफ सहेली च्या सदस्य तथा नगरसेविका डॉ. नुतन बिचोलकर यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्षा स्वाती दिवकर, माजी अध्यक्षा कल्पना साळवी, सदस्य निता पांढरे, रीतीका वैलैकर, सौ. वालावलकर, नीशा नाईक उपस्थिती होत्या