युरो प्रतीकने गोव्यात वितरकांचा भव्य मेळावा आयोजित करून नवी उत्पादने दाखल केली. युरो प्रतीक वितरकांनी नव्या उत्पादनांची मालिक सादर

.

युरो प्रतीकने गोव्यात वितरकांचा भव्य मेळावा आयोजित करून नवी उत्पादने दाखल केली.
युरो प्रतीक वितरकांनी नव्या उत्पादनांची मालिक सादर करण्यासाठी आयोजित या भव्य मेळाव्याला ७५ वितरकांनी उपस्थिती लावून यावेळी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांचा अनुभव घेतला.
जुलै, ६ २०२२ ः युरो प्रतीक, या जीवनशैली उद्योगातील अग्रगण्य कंपनीने आपल्या धडाडीच्या वितरकांसाठी अंजुना येथील हॉटेल वेस्ट इन येथे वितरक मेळाव्याचे आयोजन केले होते. या दोन दिवसीय मेळाव्याला देशातील २० राज्यांतील ७५ युरो प्रतीक वितरक सहभागी झाली होते. नानाविविध प्रकारांतील कंपनीच्या नवीन उत्पादनांचा थेट अनुभव त्यांनी प्रात्यक्षिक सत्रात घेतला. नवीन उत्पादने आणण्यासह युरो प्रतीकच्या वर्तमान विपणन धोरणाविषयी वितरकांना ज्ञान मिळवून देणे तसेच कंपनीच्या भविष्याच्या योजनांची माहिती देणे हा होता. युरो प्रतीकचा भारतभरातील वितरकांसाठीचा हा मेळावा एक प्रतिष्ठित असा सोहळा ठरला. या सोहळ्याता इंटिरियर उद्योगातील भागधारक सहभागी झाले होते.
याप्रसंगी बोलताना युरो प्रतीकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक संघवी म्हणाले की, मी उत्तर, दक्षिण, पूर्व व पश्‍चिम भारतातील सर्व वितरकांचे एकाच छताखाली गोव्यात आल्याबद्दल स्वागत करतो. मी या संधीचा लाभ उठवून युरो प्रतीक या ब्रँडच्या वाढत्या लोकप्रियतेमागील कंपनीच्या वितरकांना कृतज्ञना व्यक्त करतो. सर्व वितरक हे युरो प्रतीक परिवाराचा भाग आहेत. आम्हाला हे सांगण्यास आनंद होतो की, आम्ही आमचे जाळे देशभर अधिक मबजूत करण्यासाठी धोरण तयार केले आहे. आमच्या उत्पादनांच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. आमच्या मौलव्यान ग्राहकांना या स्थितीतही दर्जेदार उत्पादने देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
या सोहळ्याला युरो प्रतीकने आपले नवीन उत्पादन डिकोलवर्स अँड ऍक्रिलिक कोर लॅमिनेट्‌स (एसएए) लॉंच केले. ४८ नवीन व नाविन्यपूर्ण डिझाईन्समध्ये ती उपलब्ध असणार आहेत. डिकोलाईट व लवर्स यांचे ते मिश्रण असेल.
डिकोलर्सची विशेषतः म्हणजे इंटिरियर्सला ती एक वेगळे रुप प्रदान करते. ८ बाय १ व ९.५ बाय १ फूट या आकारांत ती उपलब्ध असतील. युरो प्रतीकने सादर केलेली एएसएए मॅट तसेच ग्लॉस फिनिशिंगसह तसेच अँटी स्क्रॅच, अँटी फिंगरप्रिंट, सुपर मॅट व थर्मल हिलिंग प्रॉपर्टीज या वैशिष्ट्यांसह आहे. अधिक चांगल्या प्रकारचे बॉंडिंग मिळावे यासाठी पाठीमागील साईड़ला लॅमिनेट सँडिंग करण्यात आले आहे. इंटिरियर उद्योगातील अग्रगण्य युरो प्रतीकने भारतात सर्वांत यशस्वी वॉल पॅनल डेकोलाईटचे २०१३ साली सादरीकरण केले होते यानंतर २०१८ साली देशातील सर्वांत लोकप्रिय अशा वॉल पॅनेल लवर्स नावाने दाखल केले होते.
युरो प्रतीकची सर्व उत्पादने बहुउद्देशीय कामांसाठी उपयोगी पडतात. किरकोळ विक्री करणारी आस्थापने, कार्यालये, घरे, शयनगृह, स्वयंपाकघर, स्नानघर, थियेटर, रेस्टॉरंट, स्टुडियो, ऑडिटोरियम, बैठक रुम, क्रीडा संकुल, नाईट क्लब, कॅसिनो, म्युझियम, प्रायव्हेट सुट्‌स, पार्लर आदी. युरो प्रतीक यांची श्रेणी वैविध्यपूर्ण आहे. उत्पादने व डिझाईन्स वाजवी दरात तसेच ग्राहकांच्या बजेटनुसार उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना पर्यायांचा तुडवडा कधीच भासत नाही. नवीन कटिंग एज तंत्रज्ञानाचा वापर करून जीवनशैली उत्पादने तयार केली जातात. देशातील १५० शहरांसह नेपाळ, श्रीलंका व बांगलादेस आदी देशांतही ती पाठवली जातात. बदलत्या ट्रेंडनुसार स्वतःमध्ये बदल करून सुसज्ज राहणे ही युरो प्रतीकची खासियत आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar