सरकारी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आपल्या मुलाना सरकारीशाळातच शीक्षण द्या. स्वामी विवेकानंद संस्थेच्या गौरव सोहळ्यात प्रवीण आर्लेकर

.

सरकारी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आपल्या मुलाना सरकारीशाळातच शीक्षण द्या.
स्वामी विवेकानंद संस्थेच्या गौरव सोहळ्यात प्रवीण आर्लेकर यांचे आवाहन
सरकारी शाळा बाबत एखाद्या सामाजीक क्षेत्रात काम करणाऱ्या
संस्थेला आत्मीयता व तळमळ असणे ही अभीमानाची गोष्ट असुन अशा संस्थाच्या कार्याची आपण दाखल घेउन आपण आपल्या मुलाना सरकाऱी शाळेतच शिक्षण द्यावे असे आवाहन गोवा हस्तकला महामंडळाचेअध्यक्ष तथा पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यानी केले आहे
कडशीमोपाच्या स्वामी वीवेकानंद संस्थेने आयोजीत केलेल्या विद्यार्थी गौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.यावेळी व्यासपीठावर खास निमंत्रीत म्हणुन तोर्सेचे माजी जील्हापंचायत सदस्य तथा माजी सरपंच सुर्यकांत तोरस्कर. संस्थेचे सचीव अमोल आसोलकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते खजीनदार प्रवीण गाड, माजी जील्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, माजी सरपंच मनोहर नाईक, उत्तम वीर, नवनाथ तोरस्कर आदि मान्यवर उपस्थीत होते.
आज खाजगी शाळांपेक्षा सरकारी शाळात दर्जेदार शीक्षण मीळत आहे, सरकारनेही शाळांची स्थीती चागली केली आहे सुसज्ज ईमारती ,चागला निधी व चांगले शिक्षकही दिले आहेत, त्याच बरोबर सरकारी शाळात रोढावणारी विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या साठी तळमळीने काम करणाऱ्या स्वामी विवेकानंद संस्थे सारख्या सामाजीक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाही जनजाग्रुती करीत आहेत प्रत्येक पालकानी य़ाचा विचार करुन आपल्या मुलाना प्राथमीक असो वा ईतरअसो सरकारी शाळेतच शीक्षण द्यायला हवे असे त्यानी पुढे सांगीतले
सुर्यकांत तोरस्कर यानी आपल्या भाषणातु संस्थेच्या कार्याचा गोरव करताना संगीतले की स्वामी वीवेकानंद संस्था जरी मोपा गावाची असली तरी त्यानी बरेच उपक्रम तोर्से तसेच पेडणे तालुक्यात राबवीले आहेत सरकारी शाळांबाबत त्यांची आग्रही भुमीका वाखाणण्यासारखी आहे त्यानी कोरोना काळा पुर्वी बरेच उपक्रम सरकारी शाळांसाठी राबवले हेते त्यामुळे आज पेडण्यात बऱ्याच शाळात मुलांची संख्या वाढली आहे ,कुठलेच आर्थीक पाठबळ नसताना ही संस्था समाजात कार्यरत असल्या बद्दल त्यानी कौतुक केले .
संस्थेचे संस्थापक उमेश शंकर गाड यानी संस्थेच्या कार्याची माहीती करुन देताना समाजाच्या सहानुभुतीवरच संस्थेने अनेक समाजपयोगी उपक्रम गोलीअठ्ठावीस वर्षे राबवीत आहे सर्वच क्षेत्रात संस्था कार्यरत असताना काही वर्षा पुर्वी पेडण्यात सरकाऱी शाळात प्रवेश घेणाऱ्या विद्यर्थ्यांची संख्या कमी होत असल्याने सरकार एकएक शाळा बंद करीत होते त्यावेळी संस्थेने जनजाग्रुती मोहीम हातात घेउन सर्व प्रथमीक शाळात वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आज पेडण्यात शाळा बंद होण्याचे प्रमाण घटले असले तरी आहेत त्या शाळा टिकवण्या साठी निश्चीतच प्रयत्न करु.
शाळेच्या मुख्याध्यापीका संजना कोरगावकर यानी स्वामी वेवेकानंद संस्थेने आजवर आमच्या शाळेला खुप प्रकारची मदत केल्याने आमच्या शाळेचे या संस्थेशी गेली अनेक वर्षाचे द्रुढ नाते असल्याचे सांगीतले
कार्यक्रमाच्या सुरवातीस वसंत कोळंबकर यानी सर्वांचे स्वागत केले, अमोल आसोलकर,प्रवीण गाड व कु मेघना उमेश गाड यानी भेट वस्तु देउन उपस्थीतांचे स्वागत केले . त्या नंतर प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते सरकारी हायस्कुल तोर्से या शाळेतुन शालांत परीक्षेत विषेश श्रेणीत पास झालेल्या पहील्या तीन विद्यर्थ्याचा कु. वैभवी विनायक मावळंकर समीक्षा जोसलकर अंश तोरस्कर यांचा गौरव स्मुतीचीन्ह व भेटवस्तू देउन करण्यात आला तर सरकारी प्राथमिक विद्यायल परबवाडा तोर्से या शाळेतील सुमारे एकसष्ट विद्यार्थ्याना शालेय साहीत्य व टीशर्ट भेटवस्तु देउन गौरविण्यात आले सुत्रनिवेदन वसंत कोळंबकर यानी केले, प्रास्तावीक उमेश शंकर गाड यानी केले तर शेवटी आभार अमोल आसोलकर यानी मानले कार्यक्रम यशस्वी करण्या साठी शिक्षिका दीप्ती सावंत, सुधीर तोरस्कर,प्रमोद चारी,ज्ञानेश्वर परब, सौ. नम्रता तोरस्कर .यानी विषेश परीश्रम घेतले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar