विध्यार्थ्यांनी कॉलेज जीवनांत जसे स्पर्धाशी सामना करीत यश मिळवले, त्याचबरोबरीने यशस्वी झाल्यानंतर टिकून राहायचे असल्यास प्रत्येकाने संकट,चुनौतीशी मुकाबला करण्यासाठी कठोर मनोनिग्रह घेऊन मार्गक्रमण करण्याची आवश्यकता असते व कोणत्याही परिस्थितीशी लढण्याची क्षमता दाखवावी लागते, असे प्रतिपादन समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी

.

विध्यार्थ्यांनी कॉलेज जीवनांत जसे स्पर्धाशी सामना करीत यश मिळवले, त्याचबरोबरीने यशस्वी झाल्यानंतर टिकून राहायचे असल्यास प्रत्येकाने संकट,चुनौतीशी मुकाबला करण्यासाठी कठोर मनोनिग्रह घेऊन मार्गक्रमण करण्याची आवश्यकता असते व कोणत्याही परिस्थितीशी लढण्याची क्षमता दाखवावी लागते, असे प्रतिपादन समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले.

हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या गणपत पार्सेकर महाविद्यालयाच्या स्थापना दिन समारंभात प्रमुख पाहुणे नात्याने बोलत होते.हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे दहावी व बारावीच्या परीक्षेतील घवघवीत व दर्जात्मक यश पाहता,चेअरमन पार्सेकर सर व मुख्यध्यपिका मॅडम स्मिता पार्सेकर यांचे निश्चितच अभिनंदन आहे.पंचक्रोशीचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान व उभे केलेली साधनसुविधा व साम्राज्य सहजासहजी तयार झाले नाही,त्यासाठी दूरदृष्टी व ध्येयवादी वृत्तीने ध्रुवताऱ्यासारखे अढळ स्थान निर्माण केले आहे.शैक्षणिक क्षेत्रातील सरांचे कार्य पाहता त्यांना गोवा सरकारने खास ‘किताब’ बहाल करायला पाहिजे,तसेच मॅनेजिंग कमिटीचे खास अभिनंदन असल्याचे टाळ्यांच्या कडकडाटात समाजकल्याणमंत्री फळदेसाई यांनी व्यक्त केले.

पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर निघाल्यानंतर आपण उत्कृष्टपणे शाळा विद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करणार आहात.स्वतःभोवती एक आत्मविश्वासाचे जाळे तयार करून घ्या व परिस्थितीशी सामोरे जा.कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नसते त्यासाठी कष्ठ व मेहनत घ्यावी लागते.पार्सेकर महाविद्यालयात संस्कारक्षम शिक्षण घेऊन विध्यार्थ्यांनी स्वतःचे जीवन आयुष्य स्थिरसावर करताना ह्या महाविद्यालयाचे नाव अजरामर करण्याची जबाबदारी तुमची असेल,असे आवाहन समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले.

चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर—
पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची स्थापना 2015 साली अवघ्या 44 विध्यार्थ्यांना घेऊन सुरू झाली.त्यावेळी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा,मात्र सध्या 82 टक्के गुण मिळवलेल्या विध्यार्थ्यांना प्रवेश मिळणे कठीण झाले आहे.स्थानिक पालकांचा रोष आहे,मात्र स्थिती कठीण आहे.सध्या मुलींची संख्या व प्रगती पाहता,महिलाच त्याच्या उपजत अंगभूत गुण व मायाळूपणामुळे शिक्षकीपेशाला न्याय देतात,पुरुष शिक्षकांची संख्या फारच कमी आहे, आगामी काळात पुरुष शिक्षकासाठी राखीवता आणण्याची गरज न पडो असे व्यक्त केले.पार्सेकर महाविद्यालयातून तयार झालेले शिक्षक हे गोव्याच्या विविध भागांत ज्ञानदान करतील,मात्र संस्कारक्षम शिक्षणाचा पाया विसरू नका,असे आवाहन चेअरमन पार्सेकर यांनी केले.

पार्सेकर महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आपला वाढदिवस साजरा करीत असल्याबद्दल प्राचार्य,अध्यापक व विध्यार्थ्यांचे आपण ऋणी असून भावी शिक्षकांनी आमच्या अपेक्षापूर्ती कराव्यात,असे भावुक सुरात चेअरमन पार्सेकर यांनी व्यक्त केले.प्राचार्य उदेश नाटेकर यानी विध्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती साधताना,सोशल मीडियापासून दूर राहण्याचे आवाहन केले.कॉलेजच्या चार वर्षात ज्ञान संपादन करताना अध्यापक वर्गाच्या कडक शिस्तीचा अनुभव भविष्यात कामी येईल.ह्यावेळी बीएस्सी बीएडच्या सातव्या बॅचला निरोप समारंभ देन्यात आला.पार्सेकर महाविद्यालयाने चारवर्षात पाठ्य पुस्तकी ज्ञान व समाजासाठी उपयुक्त संस्काराची शिदोरी दिली असून त्यांचा अवलंब भावी शिक्षकांनी करावा,असे नाटेकर यांनी शुभेच्छारूपात दिल्या.यावेळी कॉलेजच्या दोन्ही बी एस्सी व बी एच्या चारही वर्षाच्या गुणवंत विध्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.प्रा अनुजा नाईक यांनी सुत्रनिवेदन केले.कु रश्मी अंदुर्लकर हिस औटस्तंडींग स्टुडंट्स कु तन्वी परब हिस बेस्ट स्टुडंस ऑफ डी इयर पुरस्कार जाहीर केले.
यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत नाईक,सचिव सुधीर नाईक,खजिनदार गंगाराम गडेकर, पालक शिक्षक संघाच्या विलसिनी नाईक,हायर सेकंडरीचे प्राचार्य राज देसाई उपस्थित होते. प्रारंभी अध्यापिका वैशाली नेवगी यांनी स्वागत,प्रा फबीयोला हिने मान्यवरांचा परिचय व प्रा श्रुती,प्रा सदिच्छा हिने पुष्पगुच्छ तर प्रा सीएना फेर्नांडिस हिने आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar