मयडे ( बादैश) पंचायतीचे माजी पंच तथा समाजकार्य कतै महेश साटेलकर यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही हळदोणा मतदारसंघातील मयडे गावातील शेतकरांना खतांचे वाटप करण्यात आले.
यावेळी पंच सदस्य सुर्यकांत भाटलेकर, पुजा च्यारी माजी सरपंच संवारी, माजी सरपंच रामा साटेलकर, आदि उपस्थित होते.
गेल्या चार वर्षीपासून महेश साटेलकर आणि त्याची टिम शेतकऱ्यांना मोफत खत वाटप करतै. या उपक्रमाचा एक भाग म्हणून यावेळी हि मयडे येथील प्रत्येक शेतकऱ्यांला ५० किलो खतांचा पोताचे वाटप करण्यात आले असून या उपक्रमाचा दरवर्षी सुमारे ३५० शेतकरी लाभ घेतात. यावेळी बोलताना महेश साटेलकर म्हणजे कि शेती मालाच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. अनेक सरकारी योजना असल्या त्या गरजेचा वेळी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. खत वाटपा सोबतच आम्ही बी- बियाणे आणि शेतीसाठी आवश्यक इतर साहित्यही पुरवितो, कोणत्याही शेतकऱ्यांला शेती करण्यात अडचण येत असल्यास त्यांनी साटेलकर किंवा त्यांच्या टिमशी मदतीसाठी संपर्क साधावा असे आवाहन महेश साटेलकर यांनी केले आहे.