*’अंगणी लावा एकच तुळस प्राणवायूचा होई कळस’*अंगणी लावा एकच तुळस प्राणवायूचा होई कळस’*
न्यू इंग्लिश प्राथमिक विद्यालय केरी पेडणे शाळेत वन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
‘अंगणी लावा एंकच तुळस , प्राणवायूचा होई कळस, झाडे लावा जीवन जगवा,’ अशा घोषणा देत वृक्षदिंडी काढून अनोख्या पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकाने जनजागृती करत वन महोत्सवाची सुरुवात केली.
शाळेच्या आवारात तुळशीची झाडे फुलांची झाडे विद्यार्थी शिक्षकाने मिळून लावली विद्यार्थ्यांनी झाडे लावून त्यांची जोपासना करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत शिक्षिका सौ. सलोनी हर्जी यांनी केले. मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी वृक्ष लागवड आणि त्याची जोपासना का महत्वाची आहे याविषयी विविध उदाहरणनिसगी मुलांना महत्व पटवून दिले. यावेळी शाळेतील शिक्षिका दीक्षा माणगावकर, शमा गडेकर, सोनाली वस्त, निकिता मटकर, अल्बिना डिसोजा, महिमा चारी उपस्थित होत्या.
फोटो
केरी पेडणे प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक विद्यालयात वनमहोत्सव साजरा झाला त्याप्रसंगी मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर, सलोनी हर्जी, दीक्षा माणगावकर, सोनाली वस्त, शमा गडेकर व अन्य.