हरमल खालचावाडा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात वर्षपद्धतीप्रमाणे आषाढी एकादशीला प्रारंभ होणारा भजन सप्ताह रविवार 10 जुलै

.

हरमल खालचावाडा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात वर्षपद्धतीप्रमाणे आषाढी एकादशीला प्रारंभ होणारा भजन सप्ताह रविवार 10 जुलै रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात प्रारंभ होणार असल्याचे श्री नारायण देवस्थानचे अध्यक्ष विश्राम तारी यांनी सांगितले.

गेली कित्येक वर्षे हा उत्सव गुण्यागोविंदाने खालचा वाडा भागांतील भविकजन साजरा केला जात आहे.खूप वर्षांपूर्वी ह्या भागांत दुर्धर रोगराई पसरली होती व त्यावेळेस भाविकांना आषाढी एकादशीला जायला न मिळाल्याने ह्या मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने भजनउत्सव चालू केला.तीच परंपरा पुढे कायम राहिली व सर्वार्थाने आजची युवा मंडळी त्यात सामील होत असतात,असे तारी यांनी सांगितले.यानिमित्त दर दिवशी खालचावाड्यावरील भविकातर्फे रात्र जागर अर्थात दोन अडीच तासांचे भजन होते.भाविकांना गोडधोड व फळांचा प्रसाद दिला जातो.

ह्या उत्सवाची सांगता नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रीची मूर्ती पूजन होते व अखंड भजनी सप्ताहास प्रारंभ होतो व दीड दिवसीय उत्सव साजरा केल्यानंतर टाळाचा गजरात संपतो.अखेरच्या दिवशी भविकजन अभिषेकपूजा करतात, भाविकांना अवसारी कौल, तिर्थप्रासाद व संध्याकाळी मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर समुद्रस्थळीविसर्जन होत असते.तरी भाविकांनी आषाढी एकादशीनिमित्त उपस्थित राहून श्रीकृपेस पात्र व्हावे असे आवाहन श्री देवस्थान समितीने केले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar