सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेचा प्रसार पूर्णत्वाकडे*

.

*म्हापसा येथील सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेचा प्रसार पूर्णत्वाकडे*

म्हापसा – येथील श्री सिद्धपुरुष नारायणदेव देवस्थान सभागृह, काणका-बांध येथे सनातन संस्थेतर्फे १३ जुलै रोजी होणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रसाराची पूर्णत्वाकडे वाटचाल होत आहे. याअंतर्गत म्हापसा भागात डांगी कॉलनी, धुलेर, पेडे,
करासवाडा, गावसवाडा, आमुरली, खोर्ली, काणका, गणेशपुरी, कुचेली, याभागात प्रसारकार्य पूर्ण झाले असून शिवोली ,कामुरली, आसगाव, बादे, कायसुव , मयडे, नासनोडा, जयदेववाडा यावरीलपैकी काही भागात प्रसार चालू आहे, अशी माहिती सनातनच्या म्हापसा केंद्राच्या केंद्रसेविका सौ. शर्वाणी आगरवाडेकर यांनी दिली.
याचाच एक भाग म्हणून आता पर्यंत उसकई, अन्साभाट आणि डांगी कॉलनी अश्या तीन ठिकाणी महिला गटामध्ये प्रवचने झाली. तसेच ऑनलाइन पद्धतीनेही प्रवचने चालू आहेत. प्रवचनाना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. प्रवचनाचा विषय सर्वांना आवडत असून यापैकी अनेकांनी सनातन संस्थेच्या कार्याची भरभरून स्थुती केली.
यापैकी प्रवचनांना उपस्थित सर्वानी गुरुपौर्णिमेला आवर्जून उपस्थित रहाण्याची तयारी दाखवली आहे.
येत्या १३ जुलै रोजी संध्याकाळी ठीक ५.०० वाजता सदर उत्सव सुरू होईल. या कार्यक्रमाला प्रवचन, प्रत्यक्षिके, सनातनचे ग्रंथ प्रदर्शन, आपत्कालीन स्थितीत उपयुक्त माहिती देण्यासाठी प्रथमोपचार कक्ष, तसेच आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची माहिती देणारा लागवड कक्ष उभारण्यात येणार आहे. वरील सर्व कक्ष उत्सवाच्या आकर्षणात भर टाकील, असे सौ. आगरवाडेकर यांनी सांगितले आहे. तसेच या उत्सवाला बारदेश तालुक्यातील सर्वांना उपस्थित राहून प्रवचन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी कळकळीची विनंती केली आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar