धर्मनिष्ठ समाज निर्मितीसाठी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’त

.

धर्मनिष्ठ समाज निर्मितीसाठी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’त सहभागी व्हा ! – सनातन संस्थेचे आवाहन

    पणजी , १० जुलै – हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे ‘गुरुशिष्य परंपरा’ राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना सुव्यवस्था निर्माण करण्याचे महत्कार्य गुरुशिष्यांनी केल्याचा गौरवशाली इतिहास भारताला लाभला आहेत्या त्या काळी अधर्म माजला असतांना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाकडूनआर्य चाणक्यांनी सम्राट चंद्रगुप्ताच्या आणि शिवछत्रपतींनी संत तुकाराम महाराज अन् समर्थ रामदासस्वामी यांच्या कृपेने आदर्श असे धर्माधिष्ठित राज्य स्थापन केलेआजही राष्ट्र आणि धर्म यांची दुःस्थिती झाली आहेयावर एकमेव उपाय म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करणे हा होयहिंदु राष्ट्र अर्थात धर्मनिष्ठ समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणेही काळानुसार सर्वोत्तम गुरुसेवाच आहेहा संदेश देण्यासाठी ‘सनातन संस्थे’च्या वतीने यंदा 13 जुलै 2022 या दिवशी मराठीहिंदीगुजरातीकन्नडतमिळतेलुगुमल्याळम्बंगाली आदी भाषांमध्ये देशभरात 154 ठिकाणी प्रत्यक्षतर 10 भाषांमध्ये ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहेगोव्यात डिचोली,  ठाणे-सत्तरी, नगर्शे-काणकोण, पणजी, म्हापसा, पांडुरंग वाडी- बायणा-वास्को, ढवळी-फोंडा आणि पाजीफोंड-मडगाव येथे मिळून एकूण ८ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जाणार आहे. तरी सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी सहकुटुंब उपस्थित राहून या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावाअसे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

       सनातन संस्थेचे श्री. तुळशीदास गांजेकर म्हणाले की,  गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा अनादी काळापासून चालू आहेगुरुपौर्णिमेला नेहमीपेक्षा एक हजारपटीने कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ समाजाला घेता यावायांसाठी या ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन करण्यात आले आहेया महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पूभक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन); समाजराष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचारतसेच ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहेशिरोडकर सभागृह, डिचोली ; श्री नवदुर्गा सातेरी सभागृह, ठाणे, सत्तरी; श्री दत्तगुरु सभागृह, नगर्शे, काणकोण; श्री महालक्ष्मी देवस्थान, पणजी आणि श्री सिद्धपुरुष नारायणदेव देवस्थान, काणकाबांद, म्हापसा या सर्व ठिकाणी सायंकाळी ५ वाजता; श्री ब्रह्मस्थळ श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृह, पांडुरंग वाडी, बायणा, वास्को आणि भास्कर सभागृह, पेट्रोल पंपजवळ, ढवळी, फोंडा या दोन्ही ठिकाणी दुपारी ४.३० वाजता आणि श्री वीरशैव लिंगायत मठ, पाजीफोंड, मडगाव येथे सायंकाळी ५.३० वाजता गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जाणार आहे.  या महोत्सवात ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ हे विशेष आकर्षण असणार आहेतसेच सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉआठवले यांच्या मार्गदर्शनाचे चलचित्र (व्हिडिओदेखील दाखवण्यात येणार आहेया महोत्सवात धर्मअध्यात्मसाधनाबालसंस्कारआचारधर्मआयुर्वेदप्रथमोपचारस्वसंरक्षणहिंदु राष्ट्र आदी विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शनतसेच राष्ट्रधर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

    यांसह भाषांतील ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ सनातन संस्थेच्या ‘यूट्यूब चॅनल्स’वरून प्रसारित करण्यात येणार आहेतमराठी भाषेमध्ये गुरुपौर्णिमा सायंकाळी ७ वाजता  https://www.sanatan.org/mr/ किंवा Youtube.com/SSMarathi या लिंकवर ऑनलाईन पाहता येईल. गुरुपरंपरेचे महत्त्व समाजमनावर बिंबावेसमाज साधनेला प्रवृत्त व्हावातसेच धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती व्हावीयांसाठी या गुरुपौर्णिमा महोत्सवांत सहभागी व्हावेअसे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar