म्हापसा वाताहार इनर व्हीलक्लब म्हापसा एलाईटचा अधिकारग्रहण सोहळा म्हापसा येथे पार पडला. नुतन अध्यक्षा गिता परब तसेच त्याचे कार्यकारी मंडळ यांना इनरव्हिल च्या माजी अध्यक्षा रेखा पोकळे यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्षा प्रिया परब आणि त्याचे कार्यकारी मंडळ उपस्थित होते. मावळत्या अध्यक्षा प्रिया परब यांनी मागील वर्षी चा कामाचा आढावा घेतला.
नुतन अध्यक्षा गिता परब याचे कार्यकारी मंडळ खालील प्रमाणे अध्यक्षा गिता परब, सचिव पल्लवी तुयेकर, खजिनदार- उन्नती राऊत, संगीता चिखलीकर ( आय. एस. ओ) निलीमा केणी ( संपादक) सुहासिनी जोशी ( उपाध्यक्ष) यांनी यावेळी शपथ घेतली. गिता परब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपणाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम च्या अध्यक्षा रेखा पोकळे यांनी मावळत्या अध्यक्षा प्रिया परब यांचा शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. नूतन अध्यक्षा गिता परब यांच्या हस्ते रिया कोरगांवकर हिला मदत म्हणून शिलाई मशीन देण्यात आले. सुत्रसंचालन प्रिया वसकर हीने व राष्ट्र गीताने सांगता झाली. फोटो भारत बेतकेकर