विद्याभारती संचालित पीपल्स हायस्कूल कामुर्ली व सातेरी प्राथमिक विध्यालय कामुर्लीच्या

.
विद्याभारती संचालित पीपल्स हायस्कूल कामुर्ली व सातेरी प्राथमिक विध्यालय कामुर्लीच्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी श्री विठ्ठल मंदिर, बरवानवाडा, कामुर्ली येथे मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली. विध्यार्थानी व शिक्षकांनी पीपल्स हायस्कूल ते विठ्ठल मंदिर पर्यंत दिंडीच्या तालावर नाचत प्रवास केला. यात शिशुवर्ग ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विध्यार्थ्यांनी भाग घेतला होता. श्री विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष श्री एकनाथ वळवयकर, सातेरी प्राथमिक विध्यालयाचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री महेंद्र नाईक, जेष्ठ नागरिक श्री जयवंत नाईक गावकर तसेच विध्यालयाचे मुख्याध्यापक श्री संदीप पाळणी यांनी दीपप्रज्वलन केले व कार्यक्रमाला सुरुवात झाली.
     प्राथमिक विभागाच्या विध्यार्थ्यांनी गायन, फुगडी, व संतांची ओळख सादर केले तर इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विध्यार्थ्यांनी अभंग सादर केले. त्यानंतर प्राथमिक विभागाच्या शिक्षिका कु. पूजा शेट्ये व माध्यमिक विभागाच्या शिक्षिका सौ श्रद्धा लोटलीकर व शिक्षक श्री महेंद्र परब यांनी अभंग सादर केलेत. तर वातावरण संगीतमय करण्यासाठी तबलासाथ श्री संभाजी ठाकूर व हार्मोनियमसाथ श्री जयवंत नाईक गावकर यांनी दीली.
     संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ शिल्पा नाईक यांनी केले. तर सौ स्नेहा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar