काळानुसार ‘हिंदु राष्ट्रा’साठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवा ! – श्री. रमेश शिंदे,

.

_*सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक*_

दिनांक : 13.07.2022

_*देशभरात 154 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा*_

*काळानुसार ‘हिंदु राष्ट्रा’साठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवा ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती*

पणजी, 13 जुलै – ‘सुखस्य मूलं धर्मः ।’, म्हणजे सुखाचे मूळ धर्माचरणात आहे. समाज आणि राष्ट्र सुरळीत चालवायचे असेल, तर धर्माच्या अधिष्ठानाची सर्वच क्षेत्रांत आवश्यकता आहे. व्यक्तीगत किंवा सामाजिक जीवनात धर्माचे अधिष्ठान आले की, व्यक्ती नीतीमान बनतो आणि गैरप्रकार करण्यापासून परावृत्त होतो. त्यामुळे धर्माचे अधिष्ठान असेल, तरच धर्मनिष्ठ अर्थात् आदर्श अशा समाजाची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे राष्ट्राला खर्‍या अर्थाने उर्जितावस्था मिळवायची असेल, तर प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन, धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे. काळानुसार हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवाच आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे बोलत होते. सनातन संस्थेच्या वतीने पणजी बरोबरच गोव्यात एकूण ८ ठिकाणी, तर देशभरात 154 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. यानंतर देशभरात अन्य ठिकाणी झालेल्या गुरुपौर्णिमांच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या मराठी आणि हिंदी भाषेतील ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूंकडून शिकणे’, मराठी भाषेतील ‘श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास’, तसेच इंग्रजी भाषेतील ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेज् स्पिरिच्युअल वर्कशॉप्स इन 1992’ ‘सिकर्स रिव्हील युनिक फेसेटस् ऑफ परात्पर गुरु डॉ. आठवले’, ‘एफर्टस् ॲट द स्पिरिच्युअल लेवल फॉर रिमूव्हल ऑफ पर्सनॅलिटी डिफेक्टस्’ आणि ‘हाऊ टू प्रोगेस फास्टर स्पिरिच्युअली थ्रू सत्सेवा?’ या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ दाखवण्यात आली. या कार्यक्रमाला शिक्षणतज्ञ तथा काणकोण येथील मल्लिकार्जुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत यांनीही मार्गदर्शन केले. गोव्यात ८ ही ठिकाणी झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांचा १ सहस्त्राहून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
*9 भाषांत ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’* : यंदाच्या वर्षी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, तेलुगु, गुजराती, बंगाली, ओडिया या 9 भाषांत ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवही संपन्न झाले. या माध्यमांतून देश-विदेशांतील हजारो भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला. ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते ‘इम्पॉर्टन्स ऑफ गुरु’ या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले.*
(

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar