न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये  मनाचे श्लोक आणि स्वरकेरीचित कविता स्पर्धा

.
  न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये
मनाचे श्लोक आणि स्वरकेरीचित कविता स्पर्धा
न्यु इंग्लिश हायस्कूल केरी – पेडणे येथे गुरुपौर्णिमा  उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक आणि स्वरचित कविता स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून  न्यू इंग्लिश प्राथमिक विद्यालयाच्या पालक शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षा सिमरन तळकर उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत व्यासपीठावर तन्वी तळकर , अंकिता न्हांजी,  गोविंद कान्होजी, सलोनी हर्जी आणि मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर व्यासपीठावर होते.
 कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महर्षी व्यासांच्या प्रतिमेला पुष्पहार प्रदान करून करण्यात आली. त्यानंतर मुलांनी “गुरुने दिला ज्ञानरूपी वसा” हे गीत सादर केले. त्यास दिलीप रेडकर, यशवंत शेट्ये व रोशनी नाईक यांनी संगीतसाथ केली. शाळेतील मुलांनी सर्व मान्यवर व शिक्षकांचे ओवाळणी करून गुरुपुजन केले. हायस्कूलचे मुख्यध्यापक श्री भावार्थ मांद्रेकर यांनी  मुलांना गुरुपौर्णिमेबद्दल मार्गदर्शन केले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचा निकाल : मनाचे श्लोक स्पर्धा
इयत्ता : पहिली
प्रथम  श्रुती फरास
द्वितीय – रूची परब
इयत्ता दुसरी
प्रथम – आरोही सोसे
द्वितीय  – विशांत केरकर
इयत्ता तिसरी
प्रथम – हर्ष तळकर
द्वितीय- चेतन शेट्ये
 इयत्ता चौथी
प्रथम – गौतम राणे
द्वितीय  मोनाली रांगणेकर
 स्वरचित कविता स्पर्धा :
इयत्ता : पाचवी ते सातवी
प्रथम   – वैष्णवी राणे
द्वितीय – वैभवी कोरखणकर
तृतीय –  निधी भर्णे
इयत्ता : आठवी ते दहावी
प्रथम  – आनंद नाईक
द्वितीय   – निलया सावंत
तृतीय   – विनायक गोवेकर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सोनाली वस्त व शमा गडेकर यांनी केले. शेवटी सांघिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
फोटो: केरी पेडणे येथे न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाचे दीपप्रज्वलन करून उदघाटन करताना सिमरन तळकर. सोबत  तन्वी तळकर , अंकिता न्हांजी,  गोविंद कान्होजी व सलोनी हर्जी

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar