िसम्राट क्लब इंटरनॅशनल गोवा राज्याच्या वतीने प्रथमच राज्य पातळीवर आयोजित कार्यक्रमात गुरु आंनद नाईक यांचा सन्मान सोहळा करण्यात आला.
आनंद नाईक यांनी गायनात संगीत विशारद पदवी गंधर्व विद्यालयातून घेतली असून पणजी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रल्हाद हडफडकर यांच्या हस्ते त्याना गौरवण्यात आले. . गेल्या बर्षी शरद पाळणी यांचा सत्कार करण्यात आला होता.
सांस्कृतिक कार्यात हळदोणा सम्राट क्लब नेहमीच आघाडीवर आहे व हि परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांची चंग बांधला आहे .हळदोणा क्षेत्रात त्यांचे कला व संस्कृती विभागात भरीव योगदान असून यंदाच्या सम्राट संगीत सितारा या कार्यक्रमात दुसऱ्या उपांत्य फेरीत यशस्वी आयोजन करून सम्राट परिवाराने त्यात शाबासकी मिळवली आहे व हि उज्यल परंपरा पुढे चालू राहिल असे प्रतिपादन रवींद्र पणजीकर यांनी केले.