सरकारी हायस्कूल मेणकुरे येथे गुरुपौर्णिमा दिन मोठ्या उत्साहात साजरा

.
सरकारी हायस्कूल मेणकुरे येथे गुरुपौर्णिमा दिन मोठ्या उत्साहात साजरा
सरकारी हायस्कूल मेंणकुरे येथे गुरुपौर्णिमा दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत गावस उपस्थित होते. मुलांनी आपल्या गुरुजींचा एक तरी आदर्श अंगिकारावा. तसेच गुरुप्रती आपल्या मनात आदराची भावना ठेवावी असे उद्गार काढले.
विद्यार्थ्यांनी श्री ज्ञानेश्वर पार्सेकर यांनी लिहून दिग्दर्शीत केलेली स्वामी विवेकानंद यांच्यावरील एकांकिका यशस्वीरित्या सादर केली.
 संपूर्ण कार्यक्रमाचे जबाबदारी श्री प्रदीप मिशाळ तसेच श्री संतोष नाईक यांनी समर्थपणे पेलली.
व्यासपीठावर मराठी सांस्कृतिक केंद्राच्या अध्यक्षा सौ. स्मिता मिशाळ, विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री. गोपाळ सावंत, माजी मुख्याध्यापक श्री कालिदास नाईक, पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ. सविता नाईक विद्यालयाचे माजी शिक्षक श्री गुरुदास नाईक उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सायली नाईक तसेच कुमारी श्रुती शेटये यानी केले.
 कार्यक्रमाची सुरुवात ईश स्तवनाने झाली. त्यांना विद्यालयाचे संगीत शिक्षक ज्ञानेश्वर नाईक, प्रेरणा गावस, रेश्मा म्हामल यांनी मार्गदर्शन केले.
मराठी संस्कार केंद्रातर्फे विद्यालयाच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्याचे सूत्रसंचालन सौ.स्वप्नजा नाईक, सौ. वर्षा नाईक, सौ. सुप्रिया नाईक,  सौ. नुपूर नाईक, सौ सपना परब, सौ. रेशमी नाईक यांनी उत्कृष्टरित्या केले.
श्री संतोष नाईक यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच श्री गोपाळ धर्मा सावंत यांनी गायलेल्या गुरु परमात्मा परेशु या गिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar