सरकार देत असलेल्या योजनाचा फायदा मिळविण्यासाठी योग्य जादोपत्राचा वापर करा :पत्रकार प्रकाश धुमाळ

.

सरकार देत असलेल्या योजनाचा फायदा मिळविण्यासाठी योग्य जादोपत्राचा वापर करा :पत्रकार प्रकाश धुमाळ
म्हापसा दि १४(प्रतिनिधी ):-अनेकांना सरकार दरबारातून मिळत असलेल्या योजनाचा फायदा कसा घ्यायचा याची माहिती नसते. त्याचप्रमाणे या योजनासाठी कोणते पेपर लावायचे असतात याचीही माहिती नसते. त्यासाठी ज्या संस्था ज्यावेळी शिबिरे आयोजित करून मार्गदर्शन करतात त्याचा लाभ प्रत्येकानी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पत्रकार प्रकाश धुमाळ यांनी म्हापसा येथे केले.
खोर्ली सिम म्हापसा येथील श्री राष्ट्रोळी देवस्थानच्या सभामंडपात म्हापसा सिटीझन वेल्फेर फ्रण्ड यांनी आयोजित करण्यात आलेल्या सरकार दरबारातील १६ ते ५९ वयोगटातील गरजूसाठी सरकार कडून मिळत असलेल्या योजनाची माहिती करून देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उदघाटक या नात्याने प्रकाश धुमाळ बोलत होते. यावेळी त्याच्यासमवेत प्रमुख पाहुण्या म्हणून म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, नगरसेवक अन्वी कोरगावकर, विराज फडके, देवस्थानचे अध्यक्ष अक्षय्य साळगावकर, म्हापसा सिटीझन फोरमचे अध्यक्ष महेश कोरगावकर, सचिव संजू धारगळकर, उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर म्हणाल्या की, सरकार घरोघरी पोहचवण्यासाठी अनेक योजना राबवते पण त्याचा फायदा कसा घ्यायचा हे प्रत्येकाच्या लक्षात येणे आवशक आहे. किंवा त्यांची माहिती कुणाकडूनतरी करून घेऊन फायदा घ्यावा. जणेकरून त्या योजनापासून कुणीही वंचित राहता कामा नये.
तर नगरसेविका अन्वी कोरगावकर म्हणाल्या की, ज्यांना योजनाचा फायदा घावायचा असतो त्यांनी आपल्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक कार्ड, च्या झेरॉक्स आपल्याकडे ठेवणे गरजेचे आहे. याची आता फार गरज असते. ज्यावेळी आपण सरकारच्या कार्यालयात या योजनाचा लाभ घेण्यासाठी जातो त्यावेळी आमच्या कडे वरील कागदोपत्रे नसतात. आणि आम्हांला परत यावे लागते. त्यासाठी वरील कागदोपत्रे बाळगणे आवश्यक आहे. असे अन्वी कोरगावकर यांनी सांगितले.
प्रारंभी प्रकाश धुमाळ यांच्या हस्ते दीपप्रज्योलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागतपर भाषण महेश कोरगावकर यांनी, सूत्रसंचालन व्यंकटेश नाईक तर आभार सचिव संजीव धारगळकर यानी मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar