सनातन संस्थेतर्फे आयोजित म्हापसा येथिल ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा

.

_*सनातन संस्थेतर्फे आयोजित म्हापसा येथिल ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा*_

*काळानुसार ‘हिंदु राष्ट्रा’साठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवा ! – श्री. चेतन राजहंस राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था*

म्हापसा, 13 जुलै – ‘सुखस्य मूलं धर्मः ।’, म्हणजे सुखाचे मूळ धर्माचरणात आहे. समाज आणि राष्ट्र सुरळीत चालवायचे असेल, तर धर्माच्या अधिष्ठानाची सर्वच क्षेत्रांत आवश्यकता आहे. व्यक्तीगत किंवा सामाजिक जीवनात धर्माचे अधिष्ठान आले की, व्यक्ती नीतीमान बनतो आणि गैरप्रकार करण्यापासून परावृत्त होतो. त्यामुळे धर्माचे अधिष्ठान असेल, तरच धर्मनिष्ठ अर्थात् आदर्श अशा समाजाची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे राष्ट्राला खर्‍या अर्थाने उर्जितावस्था मिळवायची असेल, तर प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन, धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे. काळानुसार हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवाच आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. कानका-बांध, म्हापसा येथील श्री सिद्धपुरुष नारायणदेव देवस्थान सभागृहात सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस बोलत होते. ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले.

*धर्मशिक्षण शाळांमधून अगदी लहानपणापासून द्यावे* –
अधिवक्ता सौ. रोशन अभय सामंत

– आजच्या घडीला वाढते धर्मांतरण , लव्ह जिहाद यांसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी धर्मशिक्षण हे प्रभावी अस्त्र असून ते शाळांमधून अगदी लहानवयापासूनच घ्यायला पाहिजे, असे प्रतिपादन अधिवक्ता सौ. रोशन अभय सामंत यांनी केले.

सगळीच धर्मांतरणे ही आमिषे दाखवून अथवा जबरदस्तीनेच केलेली असतात. त्याचप्रमाणे लव्ह जिहाद सारखे प्रकार हे आपल्या हिंदू मुलींना फसवून केलेले असतात. पण आपल्या मुलांमध्ये धर्मशिक्षण या महत्त्वाच्या गोष्टीचे बाळकडू कमी पडत असल्याने आपल्या बाबतीत अश्या गोष्टी सर्रासपणे घडत पडतात, असे त्या पुढे म्हणाल्या. यावर उपाय म्हणजे धर्मशिक्षण व ते लहानपणापासून द्यायला हवे. धर्मजागरण करणे महत्त्वाचे असून ही जबाबदारी आता आमच्या वयाच्या तरुणांची आहे. आमचा धर्म सर्वश्रेष्ठ आहे, हे जगाच्या पाठीवर सिद्ध झालेले आहे. हे सत्य केवळ जगाने मानून चालणार नाही. तर आपणही ते मानले पाहिजे, असे त्या शेवटी म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन कु. चैताली हळदणकर व कु. सुनीता सुतार यांनी केले.

गुरुपूजन श्री. व सौ. अंकिता दत्ता परब यांनी केले. तसेच श्री. प्रकाश आपटे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. वैभव बाबु पाटणकर यांनी पौरोहित्य केले.

*आभार :*

१. गुरुपौर्णिमा उत्सवाला श्री सिद्धपुरुष नारायणदेव देवस्थान समितीतर्फे देवस्थानचे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले व तसेच देवस्थानच्या सभोवताली झालेली दाट झाडी व गवत काढून परिसर साफसफाई करून दिले. तसेच प्रवेशद्वारासमोर प्लास्टिक मॅट घालून दिले, याबाबत देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. महेश कोरगावकर यांचे आभार मानले.

२. या कार्यक्रमाला ध्वनीक्षेपण व्यवस्था, व्यासपीठ व प्रदर्शन उभारणीचे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल येथिल उद्योजक श्री. प्रवीण चारी यांचे आभार मानले.

३. म्हापसा परिसरात गुरुपौर्णिमा उत्सवाची उद्घोषणा करण्यासाठी ध्वनीक्षेपण व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल परब डेकोरेटोर्सचे आभार मानले.

४. सेवेतील साधकांना अल्पोपहार उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. प्रशांत वाळके यांचे आभार मानले.

*क्षणचित्रे* :

१. अंजुना येथील सनातन प्रभातच्या वाचक व धर्माभिमानी सौ. प्रीती नाईक यांना सांधेदुखीचा प्रचंड त्रास असूनही त्या सकाळी व संध्याकाळी अश्या दोन्ही सत्रांत कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन कु. चैताली हळदणकर व कु. सुनीता सुतार यांनी केले. गुरुपूजन श्री. व सौ. अंकिता दत्ता परब यांनी केले. तसेच श्री. प्रकाश आपटे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. वैभव बाबु पाटणकर यांनी पौरोहित्य केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar