देऊळवाडा येथील सरकारी प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

.

देऊळवाडा येथील सरकारी प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळेतील विध्यार्थी मुलांनी गुरूवर्य शिक्षकांना व आपल्या पालकांना ओवाळले व आशिर्वाद घेतले. विध्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा उत्सवाविषयी गुरूंचे महत्व सांगणारी भाषणे व प्रार्थना केली.शाळेच्या मुख्यध्यपिका रिया सावंत यांनी गुरू शिष्य परंपरेचे महत्व सांगितले व विध्यार्थी दशेत आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा नेहमीच आदर करावा ह्याविषयी विस्तृत माहिती दिली.यावेळी विध्यार्थ्यासाठी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.यावेळी विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
सूत्रसंचालन सुमित्रा पोळजी तर आभार शुभांगी ठाकूर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजीवनी नर्से,उषा नाईक,मनाली  तसेच पालकांनी विशेष सहकार्य केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar