आपल्या संस्कृती ऊत्सवाची मुलांना जाणीव करून देण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे. जेणेकरून आपली संस्कृती टिकून राहिल. जो देश आपली संस्कृती, आपला ईतिहास विसरला तो देश जगातुन नष्ट झाला. हा ईतिहास आहे. राष्ट्र टिकून ठेवायचे असेल तर आपली संस्कृती टिकवून ठेवली पाहिजे,असे प्रतिपादन समाजकार्यकर्ते शशिकांत कोरकणकर यांनी केले.
कोरकणवाडा येथील श्री देव राष्ट्रोळी मंडपात गुरूपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भजनी कला शिकणाऱ्या मुलांना गुरूपौर्णिमा उत्सवाची माहिती दिली व गुरू शिष्यांच्या नात्याविषयी देवस्थानचे अध्यक्ष श्री शशिकांत न्हानु कोरकणकर, यानी गोष्टी रूपात माहिती दिली. सर्व शिक्षार्थी विध्यार्थ्यांनी संगीत शिक्षक (श्री दिलीप रेडकर मास्तर) पूजन केले आणि आशिर्वाद घेतला. यावेळी देवस्थानचे सल्लागार श्री आत्माराम कोरकणकर उपस्थित होते. श्री सुभाष कोरकणकर यांनी सहाय्य केले. . शेवटी मुलांना, मिठाई आणि पुस्तकाचे वितरण करण्यात आले.