मुलांनी आपल्या सर्वंकष शिक्षणावर भर देताना सामाजिक मूल्येही जपावीत. जेणेकरून भविष्यात कोणत्याही संकटांना सामोरे जाण्यासाठीचा आत्मविश्वास अधिक बळावतो, असे प्रतिपादन गोवा गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुधिर केरकर

.

मुलांनी आपल्या सर्वंकष शिक्षणावर भर देताना सामाजिक मूल्येही जपावीत. जेणेकरून भविष्यात कोणत्याही संकटांना सामोरे जाण्यासाठीचा आत्मविश्वास अधिक बळावतो, असे प्रतिपादन गोवा गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुधिर केरकर यांनी केले.
मांद्रे हायस्कुलच्या पालक – शिक्षक संघाने आयोजित केलेल्या दहावीतीत गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात सुधिर केरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर हायस्कुलचे मुख्याध्यापक विवेक बोडके, पालक – शिक्षक संघाचे अध्यक्ष किशोर शेटमांद्रेकर, सचिव संदेश सावंत, शिक्षक प्रतिनिधी विश्वनाथ आजगावकर, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी नारायण बर्डे, शैलजा किनळेकर, नेत्रा मांद्रेकर, शिक्षिका सुप्रिया गोसावी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सुधिर केरकर यांनी सांगितले की, पालक आणि शिक्षकांवर कोविड काळानंतर मोठी जबाबदारी आली आहे. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी हितगुज करून त्यांना पुढील वाटचालीसाठी सज्ज करावे लागणार आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात योग्य संधी शोधून त्यादृष्टीने शिक्षण घ्यायला हवे म्हणजे त्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्य घडवण्यासाठी होईल.
मुख्याध्यापक विवेक बोडके यांनी पालक – शिक्षक संघाचे महत्त्व विशद केले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
किशोर शेटमांद्रेकर यांनी पालक – शिक्षक संघाच्या कार्याचा आढावा घेतला व गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
‘इस्रो’च्या विज्ञान मेळाव्यात सहभागी झालेलली विद्यार्थिनी सान्वी परेश आजगावकर हिचा या सोहळ्यात खास गौरव सुधिर केरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सलोनी रविंद्र राऊत, समेश गोविंद पार्सेकर, समृद्धी रामा गोवेकर, विनिशा श्यामसुंदर कोनाडकर, सुनिता बाबली सावंत, मृगाक्षी रावजी पार्सेकर, साची राजेश सावंत, राज जगन्नाथ पार्सेकर, सिंचल शशिभूषण तळकर, रेहान राजन हरमलकर, दुर्वा दिलिप म्हामल, तनया अजय केरीकर, यश्वी सुदेश कवठणकर, सानिका लक्ष्मण सातोसकर, प्रेमा विलास कोरगावकर, साक्षी शंकर सावंत, सृष्टी सदाशिव नाईक, पार्थ संतोष शेटमांद्रेकर, राज चंद्रकांत सातोस्कर या गुणवंत विद्यार्थ्यांचा सुधिर केरकर यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
शिक्षक संदेश सावंत यांनी सूत्रसंचालन केले. तसेच संघाचा अहवाल सादर केला. शिक्षिका अनुपा देसाई यांनी गौरव स्पेहळ्याचे सूत्रनिवेदन केले. विश्वनाथ आजगावकर यांनी आभार मानले.

मांद्रे : मांद्रे हायस्कुलच्या पालक – शिक्षक संघातर्फे गौरविण्यात आलेल्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत सुधिर केरकर, विवेक बोडके, किशोर शेटमांद्रेकर, संदेश सावंत, विश्वनाथ आजगांवकर, दहावीचा शिक्षकवर्ग आणि पालक – शिक्षक संघाच पदाधिकारी.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar