पालकांनी नेहमीच कौटुंबिक कलहाचे प्रदर्शन आपल्या मुलांसमोर करण्या ऐवजी चांगल्या संस्काराचे बाळकडू पाजण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन शिक्षण खात्याच्या कायदा सल्लागार विभागाचे प्रमुख दयानंद चावडीकर

.

वास्को – पालकांनी नेहमीच कौटुंबिक कलहाचे प्रदर्शन आपल्या मुलांसमोर करण्या ऐवजी चांगल्या संस्काराचे बाळकडू पाजण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन शिक्षण खात्याच्या कायदा सल्लागार विभागाचे प्रमुख दयानंद चावडीकर यांनी केले.
जेटी सडा येथील श्री सुसेनाश्रम विद्यालयाच्या पालक वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन रमेश कवठणकर,मुख्याध्यापिका सुनीता पवार, पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र तलावडेकर , गुरुदास उगवेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना चावडीकर म्हणाले, की विद्यार्थ्यावर संस्काराची सुरुवात ही त्यांच्या पालकांकडून होत असते. याचा विचार करून पालकांनी आपल्या मुलांना बालवयापासून चांगले संस्कार देण्याची आवश्यकत आहे. विद्यार्थी हा जास्त वेळ आपल्या पालकांच्या सहवासात असल्याने त्याच्यावरील संस्कार हे घरातील वातावरणावर अवलंबून असते म्हणून नेहमीच पालकांनी आपल्या घरातील कौटुंबिक कलहाचे प्रदर्शन आपल्या मुलांसमोर टाळणे आवश्यक आहे, कारण विद्यार्थ्यांची घडण हे घरातील संस्कारावर अवलंबून असते. आपल्या मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी नेहमीच पालकांनी त्याग केलेला असतो. परंतू हे सर्व करताना घरातील दुषीत वातावरणाचा परिणाम आपल्या मुलावर होणार नाही याची काळजी प्रत्येक पालकांनी घ्यायला हवी. आज प्रत्येक विद्यार्थ्यां जवळ भ्रमणध्वनी आहे. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था सुरु झाल्यामुळे त्याची आता आवश्यकता नाही, तेव्हा घरी त्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ञ चावडीकर यांनी केले.
पालकांनी यावेळी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन चावडीकर यांनी केले.
तात्पूर्वी चावडीकर यानी शाळेच्या शिक्षकां बरोबर बैठक घेऊन महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थी हा केंद्र बिंदू असल्याने त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड कशा पद्धतीने निर्माण करणे याविषयावर काही सूचना केल्या. संघटनेच्या सचिव शिक्षिका शाहिनार बी. शेख यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शिक्षिका पियेदाद फर्नांडिस यांनी प्रमुख वक्त्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका दिशा कवठणकर यांनी केले तर संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र तलावडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar