.
विद्यार्थी मंडळ ही अधिकार गाजविण्याची जागा नसुन सुसंघटनाद्वारे अनुशासन निर्माण करण्याचे व्यासपीठ आहे असे उद्गार धेंपे उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक श्री संजय नाईक यांनी काढले श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय, पीर्णच्या विद्यार्थी मंडळ अधिकार ग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत असताना त्यानी विद्यार्थ्यांना आपले व्यक्तिमत्व सुसंस्कारी व अभ्यासपूर्ण बनवा असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर विद्यार्थी मंडळाचे कार्यवाह प्राध्यापक दत्ता परब, श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री उमेश नाईक विद्यार्थी सरचिटणीस प्रदीप पार्सेकर हे  उपस्थित होते यावेळी प्राचार्य नाईक यांनी शालेय सुव्यवस्थापनासाठी विद्यार्थी मंडळांच्या सदस्यांनी कार्यरत राहण्याची नितांत गरज प्रतिपादन  केली.विद्यार्थी मंडळ कार्यवाह प्रा.दत्ता परब यांनी प्रारंभी प्रास्ताविक करताना विद्यार्थी मंडळाचे महत्त्व व कार्य या संदर्भात मौलिक विवेचन केले. यावेळी निर्वाचित झालेली विद्यार्थी मंडळ कार्यकारिणी पुढील प्रमाणे सरचिटणीस प्रदीप पार्सेकर बारावी वाणिज्य ,सांस्कृतिक सचिव मिताली तळणकर बारावी कला, सांस्कृतिक सचिव समीक्षा मालवणकर अकरावी कला ,क्रीडा सचिव दीपेश वरक अकरावी वाणिज्य ,क्रीडा सचिव आर्यन नाईक अकरावी कला, स्त्री प्रतिनिधी रीमा फडते बारावी कला ,स्त्री प्रतिनिधी विदिक्षा आगरवाडेकर अकरावी कला ,वर्ग प्रतिनिधी अकरावी कला सिमरन गावस ,वर्ग प्रतिनिधी अकरावी वाणिज्य सानिया देसाई, वर्ग प्रतिनिधी बारावी कला कुसुम पिंगे, वर्ग प्रतिनिधी बारावी वाणिज्य योगेश पाटील. कार्यक्रमाचे अंती प्रमुख पाहुणे प्राध्यापक संजय नाईक यांना प्राचार्य उमेश नाईक यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले संपूर्ण कार्य’क्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र नाईक देसाई यांनी केले तर सांस्कृतिक सचिव कुमारी मिताली तळणकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी श्री विश्वास नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar