केरी न्यू इंग्लिशची मुले गिरवताहेत चित्रपट निर्मितीचे धडे
केरी १५
गोव्यात अजून हवी तशी चित्रपट संस्कृती निर्माण झाली नाही. केरी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी चित्रपट निर्मितीचे कौशल्य आत्मसात केल्यास त्याचा गोव्याच्या चित्रश्रुष्टीच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन तामिळ चित्रश्रुष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक शाहिद यांनी केरी पेडणे येथे केले.
न्यु व्होकेशन फॉर न्यु जनरेशन या विषयांतर्गत केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुलतर्फे चित्रपट निर्मिती या विषयावर कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. त्या प्रसंगी ते प्रमुख प्रशिक्षक या नात्याने बोलत होते.
जीवन कौशल्य शिक्षणांतर्गत शाळेतर्फे आयोजित केलेल्या या वर्षीच्या दुसऱ्या कार्यशाळेत शाळेतील १२ मुलांच्या गटाला चित्रपट निर्मिती कशी करावी, याविषयावर शाहिद मार्गदर्शन करतील.
शाहिद हे स्वतः गेल्या वीस वर्षांपासून दिगदर्शन क्षेत्रात आहेत. त्यांनी आजवर टॉलिवूड चित्रपट, डॉक्युमेंट्री फिल्म्स, वेब सिटीजची यशस्वी निर्मिती केली आहे.
कार्यशाळेच्या शेवटी मुले स्वतः कथा लिहून त्यावर लघुपट निर्माण करतील. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन शाहिद या कार्यशाळेत करणार आहेत.
फोटो: केरी पेडणे येथे चित्रपट निर्मिती या विषयावर मार्गदर्शन करताना प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक शाहिद .