🚩 **केरी न्यू इंग्लिश हायस्कुलच्या सुवर्णमहोत्सवी*
*वर्षानिमित्त १७ रोजी सभा** 🚩
केरी तेरेखोल परिसर विकास, कल्याण व शिक्षण संस्था संचालित न्यू इंग्लिश हायस्कुल यावर्षी पन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्या निमित्त *रविवार १७ रोजी सकाळी ९.३० वाजता* सुवर्ण महोत्सव समितीची निवड करण्यासाठी *शाळेच्या सभागृहात* विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
*रविवार ३१ जुलै रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षाचे उदघाटन* होणार आहे. हा कार्यक्रम तसेच वर्षभर कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करावे या विषयी यावेळी सर्वांशी चर्चा करणे आणि संस्थेची सुवर्णमहोत्सव समिती निवडणे असा या सभेचा मुख्य हेतू आहे.
हायस्कुलचे *माजी विद्यार्थी, पालक, निवृत्त शिक्षक, संस्थेचे संस्थापक सदस्य, संगीत विद्यालय शिक्षक, व्यवस्थापन सदस्य आणि हितचिंतकांनी* या सभेस आवर्जून उपस्थिती लावावी असे आवाहन संस्थेचे चेअरमन नारायण सोपटे केरकर यांनी केले आहे.