बायंगिणीला कचरा प्रक्रिया प्रकल्प होऊ देणार नसल्याची
फळदेसाई यांची ग्वाही
पणजी ः कोणत्याही परिस्थितीत बायंगिणी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प होऊ देणार नाही, अशी ग्वाही कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी दिली आहे. माजी आमदारांनी या प्रकरणी निष्क्रियता दाखवली अशी टीका त्यांनी केली.
नियोजित जागेला मी भेट दिली असून सर्व स्थितीचा अभ्यास केला आहे, स्थानिकांसोबत चर्चाही केली असून कोणत्याही स्थितीत तेथे कचरा प्रक्रिया प्रकल्प बांधायला दिला जाणार नाही, असे सांगताना माजी आमदारांनी काहीच केले नसल्याची टीका त्यांनी केली.
या परिसरात सुमारे २००० हजार सदनिका असून, अंदाजे ८००० लोक तेथे राहातात. त्याशिवाय चर्च, मंदिर, मठ, विद्यालये व करमळे तळी असून हे सारे नष्ट होईल, यासाठी निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी असा प्रकल्प नेण्यात यावा अशी मागणी फळदेसाई यांनी केली. मी निवडून आल्यास चार महिने झाले आहेत, त्यापूर्वीच्या आमदारांनी, पंचायतींनी काय केले हे मला माहित नाही, पण मी हा प्रश्न अन्य सदस्यांच्या मदतीने विधानसभेत उपस्थित केल्याची माहिती त्यांनी दिली.
बायंगिणीला कचरा प्रक्रिया प्रकल्प होऊ देणार नसल्याची फळदेसाई यांची ग्वाही

.
[ays_slider id=1]