इंग्लिश प्राथमिक विद्यालय पालक शिक्षक संघ अध्यक्ष गिरीश शिरोडकर 

.
इंग्लिश प्राथमिक विद्यालय पालक शिक्षक संघ अध्यक्ष गिरीश शिरोडकर
न्यु इंग्लिश प्राथमिक विद्यालयाची  वर्ष २०२२ ते २०२४ या दोन वर्षांसाठी नवीन पालक शिक्षक संघटनेची निवडणूक करण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून  गिरीश शिरोडकर यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून प्रज्योती वस्त यांची निवड झाली.
तसेच सचिव म्हणून दीक्षा माणगांवकर, खजिनदार सलोनी हर्जी,  तर इतर कार्यकारी सदस्य म्हणून शिल्पा परब, मनीषा वेंगुलेकर, शालन सोसे, रश्मिता सावळ, स्नेहा साळगावकर, निशा परब,  सागर हर्जी, अभलेश तळकर यांची सर्वानुमते निवड झाली.
 मागील पालक शिक्षक संघटनेच्या  उपाध्यक्ष सिमरन तळकर यांनीन निवडून आलेल्या नूतन पालक शिक्षक संघटनेला शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी नवीन पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गिरीश शिरोडकर म्हणाले की,
आपल्या मुलाचं धैर्य वाढवण्यासाठी पालकांचे पाठबळ असणं खूप गरजेचं असत. सर्वांनी शाळेतील विद्यार्थी आणि शाळेच्या विकासासाठी एकजुटीने काम करावे. मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनीही नवीन पालक शिक्षक संघाला शुभेच्छा दिल्या.
फोटो: केरी पेडणे येथील न्यु इंग्लिश प्राथमिक विद्यालयाचा पालक शिक्षक संघ. अध्यक्ष गिरीश शिरोडकर, उपाध्यक्ष प्रज्योति वस्त, अभलेश तळकर, सागर हर्जी व अन्य.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar