हलाल सर्टिफिकेट’ अनिवार्य केल्याने उद्भवणार्‍या समस्यांविषयी उपस्थितांचे प्रबोधन*

.

 

*‘हलाल सर्टिफिकेट’ अनिवार्य केल्याने उद्भवणार्‍या समस्यांविषयी उपस्थितांचे प्रबोधन*
म्हापसा, १८ जुलै – शरियतवर आधारित हलाल अर्थव्यवस्था आज पुष्ट होतांना दिसत आहे. पदार्थ, वस्तू आदींच्या विक्रीसाठी ‘हलाल सर्टिफिकेट’ अनिवार्य केले जात आहे. हलाल प्रमाणपत्र केवळ मांसापुरते मर्यादित न रहाता, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालय, गृहसंस्था, मॉल यांसाठीही चालू आहे. ‘सेक्युलर’ भारतात ‘एफ्. एस्.एस्.ए.आय.’ अन् अन्न आणि औषध प्रशासन (एफ्.डी.ए.) या सरकारी संस्था असतांनाही इस्लामी धार्मिक संस्थांद्वारे देण्यात येणारे ‘हलाल सर्टिफिकेट’ अनिवार्य करणे हे एक आश्चर्य आहे. बाजारातून घरात येणार्‍या साखरेपासून ते पर्यटन क्षेत्र हलाल अर्थव्यवस्थेच्या विळख्यात गोवले गेले आहे. यामुळे भारताला, तसेच हिंदूंना गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने मरड, म्हापसा येथील तुळशीराम सभागृहात आयोजित केलेल्या ‘हिंदु-राष्ट्र’ संघटन बैठकीत श्री. रमेश शिंदे मार्गदर्शन करत होते. बैठकीला हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. नागेश जोशी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांची उपस्थिती होती.
श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले,‘‘भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्यामुळे प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे, तरीही बहुसंख्य हिंदूंवर हलाल व्यवस्था लादली जात आहे. याविषयी प्रत्येक हिंदूने याविषयी जागृत होणे ही काळाची गरज बनली आहे’’.

*जुने गोवे येथील ‘हात कातरो खांबा’चे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या हेतूने सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन*
गोव्यावर पोर्तुगिजांनी लादलेल्या इन्क्विझिशनच्या छळात निरपराध हिंदूंना, तसेच नवख्रिस्तींना शिक्षा देण्यासाठी वापरलेला जुने गोवे येथील ‘हात कातरो खांब’ आज दुर्लक्षित अवस्थेत आहे. गोमंतकीय जनतेच्या पूर्वजांनी इन्क्विझिशनच्या काळात भोगलेल्या छळाचा एकमात्र पुरावा असणार्‍या या खांबाकडे पुरातत्त्व खात्याकडून पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. ‘हात कातरो खांबा’चे जतन, संरक्षण, संवर्धन आणि सौदर्यीकरण करणे आवश्यक आहे. ख्रिस्त्यांनी अनेक देशांमध्ये केलेल्या अत्याचारांविषयी त्यांचे धर्मगुरु पोप यांनी क्षमा मागितली आहे; मग गोमंतकीयांवर लादलेल्या ‘इन्क्विझिशन’ विषयी पोप क्षमायाचना का करत नाहीत?’’. हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. नागेश जोशी यांनी ‘हात कातरो खांबा’चे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या हेतूने करायच्या प्रयत्नांविषयी उपस्थितांना माहिती दिली आणि या कार्यात राष्ट्र आणि धर्मप्रेमींनी सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गोविंद चोडणकर यांनी केले.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar