डॉ. के. ब. हेडगेवारच्या विद्यार्थ्यानी गिरवले निसर्गाच्या सानिध्यात धडे

.

डॉ. के. ब. हेडगेवारच्या विद्यार्थ्यानी गिरवले निसर्गाच्या सानिध्यात धडे

शहरातील मुलांची वाढ सिमेंटच्या जंगलात होत असल्याने निसर्गाशी त्यांची नाळ जोडलीच जात नाही. त्यामुळे निसर्गापासून मिळणाऱ्या आनंदापासून ही मुलं पारखी होऊ लागली आहेत. मात्र मुलांच्या कोवळ्या वयातच त्यांची निसर्गाशी ओळख व्हावी, निसर्गातील पानं, फुलं, झाडांशी मैत्री व्हावी यासाठी अस्नोडातील डॉ. के. ब. हेडगेवारच्या सायन्स क्लबच्या अंतर्गत ‘लर्न विथ नेचर’ या अभिनव उपक्रम शिक्षक प्रज्वल साळगांवकर यांनी सहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील Getting to Know Plants () हा धडा निसर्गाच्या आस्वाद घेत प्ले वे मेथड, लर्निंग बाय डुइंग, एक्सपोझिटरी पद्धती, रचनावादी दृष्टिकोनातून शिकवला. आज विद्यार्थ्यांना पुस्तकातील चित्रांमधूनच झाडं, फुलं आणि फळांची माहिती मिळते. प्रत्यक्षात झाडं पाहण्याची संधी त्यांना मिळत नाही. त्यामुळे पुस्तकातील झाडे ओखळणाऱ्या विद्यार्थ्यांना खरेखुरे झाड दाखविले तर ते त्यांना ओळखता येत नाही. विद्यार्थ्यांची ही कोंडी दूर व्हावी, त्यांना निसर्गाप्रती आत्मियता वाढावी, त्यातून निसर्ग संवर्धनाचे बीज या मुलांच्या कोवळ्या मनावर बिंबवले जावे, या उद्देशाने विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात जाऊन ह्या पाठातील सर्व स्कल्पना आणि तत्वे शिकवले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी झाडांचे प्रकार, पानानांबद्दल विशेष माहिती तसेच झाडाचे अवयव या सर्वाची माहिती मिळविली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात खरोखर आनंद घेतला आणि एक चांगला अनुभव मिळविला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar