डॉ. के.ब.हेडगेवार प्राथमिक – हायस्कूल -विद्यालय ,सालचावाडा -अस्नोडा येथे आषाढी एकादशी निमित्त ‘भक्तिमय दिंडी’ आयोजित करण्यात आली . यावेळी विद्यार्थी वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेत आले होते. काही विद्यार्थी विठ्ठल रखुमाई तसेच संतांच्या वेशभूषेत आली होती. शाळेच्या प्रांगणातून मुलांची दिंडी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, बंदीरवाडा येथे नेण्यात आली. प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर वेशभूषा सादर केल्या. माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार आणि घुमट आरती सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. मंजिशा घाटवळ आणि कु. रिद्धी कुलकर्णी यांनी केले आणि आभार प्रकटन शिक्षक श्री. प्रज्वल साळगावकर यांनी केले.