येथील बेकायदेशीर जेटी हटविण्यासाठी फळदेसाई यांची जहाजबांधणी कंपनीला अजून ८ दिवसांची मुदतगवंडाळी
पणजी ः गवंडाळी येथे बांधण्यात आलेली बेकायदेशीर जेटी हटविण्यासाठी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी सिनर्जी शिपबिल्डर्स या कंपनीला अजून ८ दिवसांची मुदत दिली आहे.
गवंडाळी ग्रामस्थांनी या बेकायदेशीर जेटीला प्रखर विरोध केल्यानंतर कुंभारजुवेचे आमदार फळदेसाई यांनी काही दिवसांपूर्वीच या जेटीची पाहणी केली होती.
कुंभारजुवा खाडीत भराव घालून डॉकचा बेकादेशीर विस्तार करण्यात आल्याचा दावाही ग्रामस्थांनी केला होता.
संबंधित ढाच्याचा विस्तार हा मान्यतेपेक्षा ६ मीटर अधिक खाडीत झाला असल्याचे फळदेसाई यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. जहाजबांधणी कंपनीने दहा दिवसांच्या आत संबंधित बेकादेशीर बांधकाम न हटवल्यास ते मोडण्यात येईल, असा इशारादेखील फळदेसाई यांनी दिला होता.
स्थानिक पंचायतीच्या माजी सरपंचांच्या संगनमताने जेटी वाढविण्याचे काम करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी मध्यस्थीची मागणी मी करणार आहे. कंपनीने यानंतरही कारवाई न केल्यास मी वैयक्तिक मशिनरी वापरून संबंधीत बेकायदेशीर ढाचा मोडेन, असे फळदेसाई यांनी सांगितले आहे. आचारसंहितेच्या कारणास्तव कंपनीला निर्दे, देण्यात काहीसा उशीर झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर कंपनीने आपला डॉक वाढविण्यासाठी बेकायदेशीर जेटीचे प्रकरण झळकले होते.