जीसीपीएल तर्फे गोदरेज मॅजिक बॉडीवॉश या भारताच्या पहिल्या रेडी टू मिक्स बॉडीवॉशचे अनावरण, शाहरुख खानची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती
साबणाच्या किमतीत मिळणाऱ्या प्रत्येक सॅशेची किंमत केवळ ४५ रुपये
एक टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल स्वरूप
२१,००० कोटी रुपयांच्या वैयक्तिक वॉश श्रेणीत क्रांती
कंपनीचे पर्यावरणाविषयी जागरूक जीवनशैलीच्या प्रसाराकरता जागरूकता उपक्रमांसाठी पुढील ३ वर्षांत १०० कोटी रुपये खर्च करण्याचे वचन
मुंबई, १९ जुलै २०२२: ‘पूटिंग प्लॅनेट बिफोर प्रॉफिट्स’ या मूल्याच्या अनुषंगाने गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) ने फक्त ४५ रुपयांना असलेल्या गोदरेज मॅजिक बॉडीवॉश या भारतातील पहिल्या रेडी-टू मिक्स बॉडीवॉश चे अनावरण केले. ही नवकल्पना पुनर्वापराच्या आणि अपव्यय कमी करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देते आणि त्यामुळे लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील क्रियाकलापांसाठी शाश्वत निवड करण्यास सक्षम करते.
अभिनेता शाहरुख खानला गोदरेज मॅजिक बॉडीवॉशचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि तो जनजागृती मोहिमेत सहभागी होणार आहे. गोदरेज मॅजिक बॉडीवॉश त्याच्या रेडीटू-मिक्स फॉरमॅटसह, पर्यावरणविषयक समस्या तसेच ग्राहकांच्या आव्हानांसाठी एक उपाय आहे.
भारतात दरवर्षी ३.५ दशलक्ष टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. त्वचा आणि शरीर निगा उत्पादनांमध्ये उच्च पाणी सामग्री असते; परिणामी, उत्पादनापूर्वी कित्येक टन पाणी पाठवले जाते आणि ते वाहतूक करताना तयार झालेले उत्पादन जड बनवते. गोदरेज मॅजिक बॉडीवॉशला पॅकेजिंगमध्ये फक्त १६% प्लास्टिक आणि नियमित बॉडीवॉशच्या तुलनेत फक्त १९% ऊर्जा आणि साबण बार बनवण्यासाठी लागणाऱ्या एकूण उर्जेपैकी फक्त १०% ऊर्जा लागते. जेल-आधारित पिशवी लहान आणि हलकी असल्याने प्रत्येक ट्रकमध्ये अधिक सॅशेची वाहतूक केली जाऊ शकते. त्यामुळे डिझेलचा वापर ४४% कमी होतो परिणामी नियमित बॉडीवॉशच्या वाहतुकीच्या तुलनेत ४४% कमी कार्बन उत्सर्जन होते.
ग्राहकांच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर ते साबणापेक्षा बॉडीवॉशला अधिक पसंती देतात परंतु प्रचंड किंमती हा सर्वात मोठा अडथळा आहे. गोदरेज मॅजिक बॉडीवॉश सिंगल जेल सॅशेमध्ये आणि बाटली आणि जेल सॅशेच्या कॉम्बी-पॅकमध्ये उपलब्ध आहे. सॅशेची किंमत ४५ रुपये आहे तर कॉम्बी पॅक (बाटली + जेल सॅशे) ६५ रुपयांना आहे. हे उत्पादन साबणाप्रमाणेच परवडणारे आहे. हे उत्पादन लॅव्हेंडर आणि हनी जस्मिन अशा दोन प्रकारांमध्ये येते.
या सादरीकरणाप्रसंगी बोलताना गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर सीतापती म्हणाले, “शाश्वतता ही आमच्या रणनीतीचा गाभा आहे. असे करताना आम्ही सर्वांना परवडणाऱ्या योग्य किंमतींवर अप्रतिम दर्जेदार उत्पादने बनवण्यासाठी बांधील आहोत. २०१८ मध्ये सादर करण्यात आलेला आमचा पावडर-टू-लिक्विड हँडवॉश हे आम्ही प्लास्टिक, पाण्याचा वापर आणि वाहतूक खर्च कसा कमी केला याचे उत्तम उदाहरण आहे. नवीन गोदरेज मॅजिक बॉडीवॉश फक्त ४५ रुपयांमध्ये सादर करत आम्ही ग्राहकांना साबणाप्रमाणे वाजवी किंमतीत बॉडीवॉश सादर करत आहोत. त्याच वेळी हे उत्पादन खिशाला परवडणारे आणि पर्यावरण पूरक आहे याची खात्री केलेली आहे. गोदरेज मॅजिक बॉडीवॉशचा चेहरा म्हणून शाहरुख खानच्या नावाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही प्लास्टिक, कार्बन फूटप्रिंट विषयी जागरूकता निर्माण करणे आणि बॉडीवॉशच्या माध्यमातून आंघोळीच्या वेळी साबण वापरणाऱ्यांचा अनुभव अधिक समृद्ध करणे यासाठी या उत्पादनाकरता सेलिब्रिटीना सामावून घेतले आहे.”
ते पुढे म्हणाले, “मला विश्वास आहे की पर्यावरणावर भार टाकून नाही तर पर्यावरणाचे रक्षण करत भारतातून तयार होणारी गोदरेज मॅजिक आणि इतर अग्रगण्य पर्यावरणीय नवकल्पना उत्पादने हे भविष्य आहे. आम्ही सामाजिक उपक्रमांसह पर्यावरणाविषयी जागरूक जीवनशैलीच्या
जनजागृती उपक्रमांसाठी पुढील ३ वर्षांमध्ये १०० कोटी रुपये खर्च करण्याचे वचन देत आहोत.
बॉडीवॉशचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून आपल्या नियुक्तीवर भाष्य करताना अभिनेता शाहरुख खान म्हणाला, “पर्यावरणाविषयी जागरूक जीवनशैलीला समर्थन देण्यासाठी हुशारीने डिझाइन केलेले हे एक नाविन्यपूर्ण उत्पादन आहे आणि अक्षरशः जादू आहे! ही एक साधी आणि प्रभावी कल्पना आहे जी प्लास्टिकचा कचरा आणि ऊर्जेचा वापर कमी करण्यास मदत करेल. याचे समर्थन करण्याचा मला अभिमान वाटतो आणि मला वाटते की शाश्वतता ही जीवनाची निवड आहे आणि कोणीही लहानात लहान मार्गाने त्याचा अवलंब करू शकतो.”
गोदरेज मॅजिक बॉडीवॉश लॅव्हेंडर आणि हनी जॅस्मीनच्या आनंददायी सुगंधांनी युक्त असून तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवण्यासाठी त्वचा आणि शरीराला टवटवीत करते. बाटलीमध्ये पाणी घाला, त्यात जेल घाला आणि १-२ मिनिटे जोरात हलवा. एका जेलच्या सॅशेमधून २०० मिली गोदरेज मॅजिक बॉडीवॉश बनवू शकतो.
जीसीपीएल मधील गोदरेज मॅजिक हा रेडी टू मिक्स ब्रँड आहे. २०१८ मध्ये ‘मॅजिक’ पोर्टफोलिओ अंतर्गत भारतातील पहिला पावडर-टू-लिक्विड हँडवॉश – गोदरेज मॅजिक हँडवॉश सादर करण्यात आला. गोदरेज मॅजिक बॉडीवॉश या श्रेणीचा विस्तार करणे ही मॅजिक श्रेणीतील दुसरी जोड आहे. रेडी टू मिक्स श्रेणी तयार करण्याबरोबरच हे सादरीकरण म्हणजे शाश्वतता आणि पर्यावरण पूरक उत्पादने निवडण्यासाठी ग्राहकांना प्रेरणा देण्याच्या जीसीपीएलच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार आहे.
*****
गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड विषयी:
गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स ही एक आघाडीची उभरती बाजारपेठ कंपनी आहे. १२५ वर्षे जुन्या गोदरेज समूहाचा एक भाग म्हणून विश्वास, सचोटी आणि इतरांबद्दल आदर या मजबूत मूल्यांवर उभारलेला अभिमानास्पद वारसा आम्हाला लाभला हे आमचे भाग्य आहे. त्याच वेळी आम्ही वेगाने प्रगती करत आहोत आणि आमच्या रोमांचक, महत्त्वाकांक्षी आकांक्षा आहेत.
आज, आमच्या समूहाला विविध व्यवसायांमध्ये जागतिक स्तरावर १.१५ अब्ज ग्राहकांचे संरक्षण लाभले आहे. जीसीपीएल भारत, इंडोनेशिया आणि आफ्रिकेच्या उदयोन्मुख बाजारपेठेतील सर्वात मोठ्या घरगुती कीटकनाशके, एअर केअर आणि केसांची काळजी घेणाऱ्या उत्पादकांपैकी आहे. घरगुती कीटकनाशक उत्पादकांमध्ये आम्ही भारतातील अग्रेसर आहोत, इंडोनेशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे उत्पादक असून आफ्रिकेत आमचा ठसा विस्तारत आहोत. आफ्रिकन वंशाच्या महिलांच्या केसांच्या काळजीच्या गरजा पूर्ण करण्यात आम्ही आघाडीवर आहोत, हेअर कलर विभागा मध्ये भारतात आणि उप-सहारा आफ्रिकेत अग्रणी आणि लॅटिन अमेरिकेतील आघाडीच्या उत्पादकांमध्ये आहोत. आम्ही भारतातील साबणांच्या विभागामध्ये क्रमांक दोनवर आहोत आणि इंडोनेशियामध्ये एअर फ्रेशनर्स आणि वेट टिश्यूजमध्ये पहिल्या क्रमांकावर आहोत.
पण आमची मजबूत आर्थिक कामगिरी आणि नाविन्यपूर्ण, खूप आवडती उत्पादने याशिवाय आम्ही एक चांगली कंपनी राहणे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. आमच्या समूहातील प्रवर्तक होल्डिंगपैकी अंदाजे २३% पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षणात गुंतवणूक करणाऱ्या ट्रस्टमध्ये आहेत. अधिक सर्वसमावेशक आणि हरित भारताची निर्मिती करण्यासाठी आम्ही आमच्या ‘गुड अँड ग्रीन’ दृष्टिकोनातून बदल घडवून आणण्यासाठी आमची आवड आणि हेतू एकत्र आणत आहोत.
या सर्वांच्या केंद्रस्थानी आमची प्रतिभावान टीम आहे. चपळ आणि उच्च-कार्यक्षमता संस्कृतीसह प्रेरणादायी कार्यस्थळाला प्रोत्साहन देण्यात आम्हाला खूप अभिमान वाटतो. आम्ही आमच्या टीममधील वैविध्य ओळखण्यासाठी आणि त्यांचे मूल्य जोखण्यासही कटिबद्ध आहोत.