हरमल पंचक्रोशीला योगामध्ये तालुक्यात द्वितीय स्थान*
क्रीडा संचालनालय व युवा व्यवहार खात्याने आयोजित 17 वर्षाखालील योगा स्पर्धेत हरमल पंचक्रोशीच्या 17 वर्षाखालील संघाला पूर्ण पेडणे तालुक्यात सांघिक गटात द्वितीय स्थान प्राप्त झाले. या संघात
यश गावडे
ओमकार गावडे
अमेय भोसले
राहुल पार्सेकर
एकनाथ पाटील
यांचा समावेश होता ल.यापैकी *अमेय भोसले* याला वैयक्तिक गटात सतरा वर्षाखालील मुलांमध्ये तालुक्यात द्वितीय स्थान प्राप्त झाले हे विशेष. या संघाला हरमल पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाचे शारीरिक शिक्षक श्री हेमंत सिताराम नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. या घवघवीत यशाबद्दल संघाचे खेळाडू,शारीरिक शिक्षक, तसेच मुख्याध्यापिका स्मिता पार्सेकर यांचे पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे.