केरी न्यू इंग्लिश प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
केरी गावचे व तुये पेडणे येथे स्थायिक झालेले संतोष बाबाजी वस्त, यांनी आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ शालेय मुलांसाठी बॅग आणि वह्यांचे नुकतेच शाळेच्या सभागृहात वाटप केले.
या कार्यक्रमाला वस्त यांच्या सोबत शाळेचे मुख्याध्यापक भावार्थ माद्रेकर ,सलोनी हर्जी, शमा गडेकर , दिक्षा माणगावकर, सोनाली वस्त, निकीता मठकर व आल्बिना डिसोझा व्यासपीठावर उपस्थित होत्या.
विधालयातील एकुण २५ विद्यार्थ्यांना हे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
: केरी पेडणे येथे मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करताना संतोष वस्त. सोबत मान्यवर.