केरी न्यु इंग्लिश हायस्कुलच्या सुवर्ण महोत्सवा प्रीत्यर्थ आंतर शालेय नाट्य छटा स्पर्धा
केरी तेरेखोल परिसर विकास, कल्याण आणि शिक्षण संस्था संचालित न्यु इंग्लिश हायस्कुल वर्ष २०२२ -२३ मध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. याचाच भाग म्हणून शाळेने शुक्रवार दि २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता पेडणे तालुका मर्यादित आंतर शालेय नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन केले आहे.
यावर्षी गोवा आपल्या मुक्तीचे हिरक महोत्सवी वर्ष, तर भारत स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्या अनुषंगाने गोवा मुक्ती संग्राम किंवा भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणादायी प्रसंग नाट्यछटा स्पर्धेच्या माध्यमातून सादर केले जातील.
प्रथम विजेत्या शाळेला रोख पाच हजार रुपये, स्मृतीचषक द्वितीय विजेत्यास रोख तीन हजार, स्मृतीचषक, तृतीय विजेत्यास दोन हाजर, स्मृतीचषक बक्षीस म्हणून देण्यात येईल. या व्यतिरिक्त उत्कृष्ट कलाकार आणि दिग्दर्शनासाठी विशेष पारितोषिक दिले जाईल.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांसाठी प्रत्यक्ष नावनोंदणीची अंतिम तारीख २५ जुलै आहे. इच्छुक शाळांनी न्यू इंग्लिश हायस्कुल, केरीच्या कार्यालयात किंवा ७७२२०३६९८९ किंवा ८००७२९०१५३ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नारायण सोपटे केरकर आणि मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी केले आहे.