प्रा. मयेकर यांना ‘ज्ञानपीठ’ने सन्मानित करावे प्रा. कनयाळकर : ‘कोमप, गोवा’तर्फे म्हापशात

.

 

म्हापसा येथे ‘कोकण मराठी परिषद, गोवा’तर्फे आयोजित कार्यक्रमात प्रा. गोपाळराव मयेकर यांना आदरांजली वाहताना प्रा. सुमंत कनयाळकर. बाजूला प्रा. सुभाष पाटील, नारायण राठवड, शीतल साळगावकर व इतर मानध्यवर.

 

प्रा. मयेकर यांना ‘ज्ञानपीठ’ने सन्मानित करावे

प्रा. कनयाळकर : ‘कोमप, गोवा’तर्फे म्हापशात आदरांजली

म्हापसा दि. २३, (प्रतिनिधी) :

स्वत:च्या रसाळ वाणीने गोमंतभूमीवर व्याख्याने देणारे गोमंतक मराठी अकादमीचे माजी अध्यक्ष प्राचार्य गोपाळराव मयेकर यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती थयथया नाचत होती. शिक्षण, साहित्य, राजकारण, अध्यात्म, वक्तृत्व अशा बहुविध क्षेत्रांत अद्वितीय योगदान दिल्याने त्यांना निदान आता तरी केंद्र सरकारने ज्ञानपीठ अथवा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा कार्याचा यथोचित गौरव करावा, असे भावनोद्गार माजी प्राचार्य सुमंत कनयाळकर यांनी व्यक्त केले.

प्रा. गोपाळराव मयेकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त ‘कोकण मराठी परिषद, गोवा’ तर्फे त्यांना म्हापसा येथे (शुक्रवार २२ रोजी) मान्यवरांकडून आदरांजली वाहण्यात आली. प्रा. मयेकर यांनी दीर्घकाळ अध्यापन करून प्राचार्यपद भूषवलेल्या आसगाव-म्हापसा येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या बांदेकर महाविद्यालयातील प्रा. सुभाष पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यानिमित्त प्रा. मयेकर यांच्या एकंदर ग्रंथसंपदेचे तसेच त्यांच्या प्रवचनांच्या डीव्हीडी संग्रहाचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.

या वेळी ‘कोमप’चे अध्यक्ष सुदेश आर्लेकर, सचिव अक्षता किनळेकर, साहित्यिक शीतल साळगावकर, योगशिक्षक नारायण राठवड, वेरे येथील प्रगती हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय शिरगावकर, कवी शिवानंद साळगावकर, म्हापशातील सामाजिक कार्यकर्ता एकनाथ म्हापसेकर, महेश शिरगावकर व सुदेश तिवरेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रा. कनयाळकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, की कविमनाचे प्रा. मयेकर हे जाज्वल्य मराठीप्रेमी होते. म्हापशाचे माजी आमदार व गोव्याचे माजी शिक्षणमंत्री या नात्याने त्यांचे कार्य अतिशय प्रशंसनीय होते. रसाळ वाणीने मराठीत प्रवचने देण्यात त्यांचा लौकिक तर होताच. त्याचबरोबर इंग्रजीवरही त्यांचे प्रभुत्व होते. म्हणूनच त्यांनी खासदार या नात्याने लोकसभेत बोलताना गीतेचे सार संसद सदस्यांसमोर प्रभावीरीत्या अभिव्यक्त केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. सुभाष पाटील म्हणाले, मयेकरसरांनी गोव्यात तसेच इतरत्रही अनेक संस्था निर्माण केल्या. त्या संस्था आजही यशस्विरीत्या कार्यरत आहेत. राजकारण, साहित्य, शिक्षण इत्यादी क्षेत्रात कार्यरत असताना ते सत्तेच्या उबेने कधीच आत्मकेंद्रित झाले नाहीत. शिक्षण क्षेत्रातील व्यवस्थापन उत्कृष्टपणे हाताळताना त्यांनी नेहमीच माणुसकीची जपणूक करीत कदापि सुडबुद्धीने न वागता सहकाऱ्यांना नेहमीच मदतीचा हात दिला. त्याचमुळे त्यांचे एकंदर कार्य प्रशंसनीय तथा आदर्शमय होते, असेही प्रा. पाटील यांनी सांगितले.

या वेळी नारायण राठवड, शीतल साळगावकर, संजय शिरगावकर, एकनाथ म्हापसेकर यांनीही मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन अक्षता किनळेकर यांनी, तर आभारप्रकटन शीतल साळगावकर यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar