श्री शांता विद्यालयातील शिशुवाटिकेची भातमळयात निघाली शैक्षणिक सहल
विद्याभारती संचालित सडये शिवोली येथील श्री शांता विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सृजनशील व कृतीशील उपक्रम राबविले जातात ,याच अंतर्गत श्री.शांता विद्यालयाच्या शिशुवाटीकेच्या मुलांसाठी कृतीशील असा उपक्रम आयोजित करण्यात आला. शेतामधील भातरोवणे दाखवण्यासाठी दिनांक २२ जुलै २०२२रोजी कुळणा कोलवाळे येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी तेथील भातशेतीचा अनुभव घेतला व निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला.यावेळी. विद्यार्थ्या सह शिक्षिका सौ.उत्तरा लोटलीकर ,सौ.गीता होडगे व कर्मचारी कविता गोल्तेकर उपस्थित होते.