अमेरिकेतील कॉसमॉस इंटरनॅशनल मध्ये
गोव्याची रिना जैन फर्स्ट रनर अप
पणजीः अमेरिकेतील प्लारिडा येथील ऑर्लेंडो येथे नुकत्याच झालेल्या मिसेस कॉसमॉस इंटरनॅशनल 2022 मध्ये गोव्याच्या रिना जैन हिने फर्स्ट रनर अप म्हणून स्थान मिळविण्याचो गौरव प्राप्त केला. मिसेस इंडिया 2021. मिसेस कॉसमॉस इंडिया 2021 व आंतरराष्ट्रीय ग्लॅमर प्रोजेक्स उपाधी नंतर तिने मिळविलेले हे आणखी एक यश आहे.
“आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधीत्व करीत असताना मी मिळविलेल्या या य़शाबददल मला सार्थ अभिमान आहे. देवाची प्रत्येकासाठी एक योजना असते आनी मला त्याने जो मार्ग दाखविला आहे त्या मुळे मी खूप उत्साहित आहे” अशें तिने सांगितले.
“कॉसमॉस इंटरनॅशनल हा एक सुरेख प्रवास आहे. आम्ही जगभरातील सहभागींना भेटतो. मैत्री करतो, एकमेकांची काळजी घेतो हा अनुभव अभूतपूर्व आहे असेही ती म्हणाली. 4 ते 9 जुलै दरम्यान झालेल्या या सर्धेंत वैयक्तिक मुलाखत, पोहण्याचा पेहराव, राष्ट्रीय पेहराव व भव्य अंतिम फेरी अश्या फेरी झाल्या. रिना जैन हिने परिधान केलेल्या आकर्षक डिझायनच्या पेहरावान सगळ्याचे लक्ष ओढून घेतले. राष्ट्रीय पेहरावाच्या फेरीत तिणे खास डिझायन केलेला ‘जंत्र जल राणी’ हा पेहराव परिधान केला होता. या माझ्या पेहरावात पांढरा व नेव्ही निळा ह्या भारताच्या तिरंग्यातील रंगाना प्राधान्य दिले होते अशें तिने सांगितले.
कॉसमॉस इंटरनॅशनलसाठी अग्रस्थानी आलेल्या 6 स्पर्थकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. या वेळा रिनाने परिधान केलेला दी स्नो एंजल हा पेहराव सगळ्याचे लक्ष वेधून घेत होता. जैनने प्रश्नोत्तर फेरीत तिच्या गौरवाच्या क्षणावर शिक्कामोर्तब केले, जिथे तिला यशासाठी सर्वात महत्त्वाची गुणवत्ता विचारण्यात आली. “वॉल्ट डिस्ने एकदा म्हणाले होते, ‘जर तुम्ही स्वप्न पाहू शकता, तर तुम्ही ते करू शकता’. यश हे कठोर परिश्रम, समर्पण, दृढनिश्चय आणि तुमचे ध्येय साध्य होईपर्यंत तुम्ही काय देता याचे उत्तर आहे,” असे जैन यांनी परिक्षकांना दिलेले उत्तर होते
“माझ्या स्वतःच्या प्रगतीवर मात करणे हे नेहमीच माझे ध्येय असते. मानवजातीला आणि निसर्गाला परत देण्यावर माझा विश्वास आहे. जर तुम्ही एखाद्यासाठी दिवा लावलात, तर तो तुमचा मार्गही उजळ करेल. अल्बर्ट आइनस्टाईन यांचे म्हणणे आहे, ‘निसर्गात खोलवर पहा, आणि तुला सर्व काही चांगले मिळेल,” ती म्हणाली.
जैन या स्टॉकहोम डिस्टिलर्स अँड व्हिंटनर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. एक दशकाहून अधिक काळ, त्या सक्रियपणे आर्ट शो क्युरेट करत आहेत आणि त्यांनी वन्यजीवांवर अनेक पुस्तके सह-लेखन आणि प्रकाशित केली आहेत.