*_विशेष संवाद : ‘बांग्लादेशी हिंदूंवरील अत्याचाराविषयी सरकार गप्प का ?’_*
*जगभरातील देश, संयुक्त राष्ट्र व भारत यांनी बांग्लादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा !* – अधिवक्ता (पू.) रवींद्र घोष, अध्यक्ष, बांग्लादेश मायनॉरिटी वॉच
सध्या बांग्लादेशात हजारोंच्या संख्येने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुसलमानांकडून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. कुराण अथवा महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचा खोटा आरोप करून हिंदूंची मंदिरे तोडणे, देवतांच्या मूर्ती फोडणे, हिंदूंच्या वस्त्या जाळणे, हिंदूंच्या हत्या करणे, तसेच महिला-मुली यांवर बलात्कार केले जात आहेत. हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. बांग्लादेश सरकार आणि पोलीस हिंदूंच्या रक्षणासाठी काहीही करत नाही. त्यामुळे आता हिंदू सुरक्षितपणे बांग्लादेशात राहू शकत नाहीत. हिंदूंच्या रक्षणासाठी तेथे कोणी नाही. हे असेच चालू राहिले, तर पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होऊन बांग्लादेशात हिंदू शिल्लक रहाणार नाहीत. त्यामुळे जगभरातील देश, संयुक्त राष्ट्र संघ आणि भारत यांनी या विषयात लक्ष घालून हिंदूंच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, *असे कळकळीचे आवाहन हिंदूंच्या मानवाधिकारासाठी लढा देणारे ‘बांग्लादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता (पूज्य) रवींद्र घोष* यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित *‘बांग्लादेशी हिंदूंवरील अत्याचाराविषयी सरकार गप्प का ?’* या विषयावरील ऑनलाईन ‘विशेष संवादा’त ते बोलत होते.
या वेळी *बांग्लादेशातील ‘रिसर्च ॲन्ड एम्पावरमेंट ऑर्गेनाइजेशन’चे अध्यक्ष प्रा. चंदन सरकार म्हणाले की,* वर्ष 2012 ते 2022 मध्ये बांग्लादेशामध्ये नियोजनबद्धरित्या हिंदूंच्या वस्त्यांवर हल्ले करून हिंदूंना लक्ष्य केले जात आहेत. जेणेकरून हिंदू बांग्लादेश सोडून पळून जावेत. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या सातत्याने घटत आहे. पूर्वी 28 टक्के असणारी संख्या आता 6 टक्के राहिली आहे.
*बांग्लादेशातील ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’चे प्रधान सचिव श्री. दिपेन मित्रा म्हणाले की,* गेल्या काही माहिन्यात 325 पेक्षा अधिक हिंदूंची मंदिरे, श्री दुर्गापूजा पंडाल यांची तोडफोड करण्यात आली. हिंदूंच्या हत्या करून महिलांना पळवले जात आहे. हिंदूंना कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत; मात्र संपूर्ण जग आणि शेजारील देश भारत शांतपणे हे पहात आहेत. हिंदूंचा छळ थांबवण्यासाठी आम्हाला साहाय्य हवे आहे.
*या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे म्हणाले की,* कुठे मुसलमानांवर जरा काही अत्याचार झाले, तर जगभरातील 57 इस्लामी देश एकत्र येऊ त्याविरोधात आवाज उठवतात. ‘संयुक्त राष्ट्र संघ’ आणि ‘युरोपीय युनियन’ही मुसलमानांच्या बाजूने बोलतात; मग 30 वर्षांपासून चालेला काश्मिरी हिंदूंचा नरसंहार आणि बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविषयी ते का बोलत नाहीत ? यासाठी समस्त हिंदूंनी आता एकत्र आले पाहिजे. बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात ‘नेदरलँड’चे खासदार गिर्ट विल्डर्स हे 13 प्रश्न विचारून जगभर आवाज उठवतात. तसे भारतातील बांग्लादेशी दूतावासाच्या बाहेर हिंदूंनी निदर्शने करून त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. ‘मानवाधिकार संघटना’ आणि ‘संयुक्त राष्ट्र संघ’ यांना जाब विचारला पाहिजे.(