गणपत पार्सेकर महाविद्यालयामध्ये कुमारी सानिया इब्राहिम आगा

.

16 जुलै रोजी गणपत पार्सेकर महाविद्यालयामध्ये कुमारी सानिया इब्राहिम आगा हीचा शाळेत तिसरी आल्याबद्द्दलचा आय ए एस ऑफिसर श्री आशुतोष आप्पा तेली सरांच्या हातून सत्कारसोहळा अगदी अंगावर काटे आणणारा होता. सर्वानी अगदी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे कौतुक केले. आणि तिचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास माझ्या डोळ्यासमोरून गेला. साधारण दहा वर्षापूर्वी माझी नियुक्ती मांगिरीश विद्यालया इग्लिश हायस्कूल मध्ये सहायक शिक्षिका म्हणून झाली . त्यावेळी मी नेहमी एका आईला आपल्या मुलीला पकडून नेत आरोबा प्राथमिक शाळेत पोहचवत असल्याचे पहात होते.एक दोन वर्षानंतर व्हीलचेअरवर ती तिला पोहचवू लागली.तेव्हा जाणवलं तिला चालता येत नसावं.प्राथमिक शाळा फक्त चौथीपर्यंत असल्याने तिच्या पालकांनी मोठ्या आशेने तिचा प्रवेश आमच्या शाळेत केला.कोणाच्या साहाय्याशिवाय चालता जरी येत नसले तरी तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणि आत्मविश्वास जाणवायचा. अभ्यासात हुशार,तिच्या मैत्रिणींनी नेहमी तिला साथ दिली. सगळा शिक्षकवर्ग नेहमी तिच्या पाठीशी असायचा. दुसरीकडे तिचे आईबाबा तिला बरं करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते. गोवा मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी त्यांच्या मनात एक आशेचा किरण जागवला होता. इयत्ता सातवीचं शैक्षणिक वर्ष दोन्ही पायांच्या शस्त्रक्रिये मध्ये निघून गेलं. त्यावर्षी तिची शाळेतील हजेरी खूपच कमी होती. एका वर्षाचे शैक्षणिक नुकसान सानियाने मैत्रिणींच्या सहाय्याने आठवी इयत्तेत भरून काढले. कोरोनाची महामारी सुद्धा तिच्या शैक्षणिक प्रवासात आडवी येऊ शकली नाही. अथक परिश्रमाने ती गोवा बोर्डाच्या परीक्षेत 68 टक्के गुण घेऊन शाळेत तिसरी आली. शिक्षिका ह्या नात्याने मला तिचा खूप अभिमान वाटतो.तिच्याबरोबर तिच्या आईबाबांचे कष्ट नक्कीच एक दिवस फळाला येतील. बाळा दुसऱ्यांना प्रेरणा देणारे तुझे व्यक्तिमत्व आहे . तू खूप मोठी होशील. आमचा आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी असेल. सौ गौरी रोशन वेर्लेकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar