_*होंडा येथे पेट्रोलपंपवर सशस्त्र हल्ल्याची घटना*_
*हल्लेखोरांमागे ‘पी.एफ्.आय्.’चा हात आहे का, याचा पोलिसांनी छडा लावावा ! – हिंदु जनजागृती समिती*
वाळपई, २७ जुलै – होंडा येथील पेट्रोलपंपचा कर्मचारी महादेव गावकर यांच्यावर २४ जुलै या दिवशी सायंकाळी बिठ्ठोण येथे रहाणारे संशयित कादर शेख आणि सलिम चोरावत यांनी चाकू आणि सुरे घेऊन आक्रमण केले. या घटनेनंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. होंडा येथे पेट्रोलपंपवर सशस्त्र हल्ला करणार्या धर्मांधांच्या मागे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (‘पी.एफ्.आय्.’चा) या आतंकवादाशी संबंधित संघटनेचा हात आहे का? याचा पोलिसांनी छडा लावावा. तसेच ही गुंडगिरी बंद करण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
हल्लीच मडगाव येथे एका घटस्फोटीत ३० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित धर्मांधाने महिलेचे दागिने आणि रोख रक्कम मिळून सुमारे १० लक्ष रुपये पळवले आहेत. याविषयी पोलिसात तक्रार झाल्यानंतर संशयित धर्मांध फरार झाला आहे. ही ‘लव्ह जिहाद’ची घटना आहे का? तसेच यामागेही ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (‘पी.एफ्.आय्.’चा) यांचा हात आहे का? याविषयी शासन आणि पोलीस यंत्रणा यांनी चौकशी करावी, अशी समितीने मागणी केली आहे..