कारगिल दिवस म्हापसा

.

कारगिल दिवस म्हापसा

जायंटस गृप ऑफ खोरलीम सहेली तर्फे, म्हापशाच्या जनता हायस्कूल मध्ये, 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.8वी व 9वीच्या मुलांसाठी निबंध स्पर्धा ठेवण्यात आली.विषय होते , भारतीय सैनिक व कारगिल दिवसाचे महत्त्व. तीन उत्कृष्ट निबंध लेखनास पारितोषिके व सर्टिफिकेट देण्यात आली.व भाग घेतलेल्या सर्व मुलांना पेन सेट देण्यात आले.शाळेतील मुलांना कारगिल दिवसानिमित्त मनगटावर बांधायला रिबिन बॅन्ड्स वाटण्यात आले.खोरलीम सहेलीच्या अध्यक्ष, डाॅ. स्वाती दिवकर यांनी कारगिल दिवसाचे महत्त्व मुलांना सांगितले. त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक श्री अनुप पोळे यांनी आपले मनोगत मांडले.खोरलीम सहली तर्फे नगरसेविका डाॅ. नूतन बिचोलकर यांनी आभार व्यक्त केले.त्याचप्रमाणे शाळेच्या शिक्षिका राजश्री भोगटे व टीचर दया उपस्थित होत्या.खोरलीम सहेलीच्या इतर सदस्य, निलम नाईक, प्राची काकतकर, जान्हवी पुराणिक व रितिका वाडकर यांचाही कार्यक्रमाला हातभार लागला.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar