लायन्स क्लब ऑफ म्हापसा चा अधिकारग्रहण सोहळा म्हापसा येथील बोडगेश्वर सभागृहात पार पडला.
परमानंद आमोणकर यांनी २०२२-२३ या वर्षासाठी ५८ वे अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला
. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विवेक नाईक
. उपस्थित होते यावेळी त्यांनी लायन्स क्लब म्हापसा करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले व त्या नी असेच समाजोपयोगी उपक्रम राबवले असे आवाहन केले
क्लबचे मावळते अध्यक्ष सुदेश कोचरेकर यांनी स्वागत केले. सचिव श्रीधर नाईक यांनी मागील वर्षी चा अहवाल सादर केला. नुतन अध्यक्ष परमानंद आमोणकर तसेच संचालक मंडळाचा शपथविधी ग्रहण अधिकारी आग्नेलो सिल्वा यांनी घडवून आणला. यावेळी सचिव उदय नासनोडकर व खजिनदार म्हणून अनील शर्मा याची निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर गोकुळदास नागवेकर, उदय नासनोडकर, मनोज चिंदरकर, डॉ. विवेक नाईक उपस्थित होते. डॉ. नाईक यांच्या हस्ते साहित्यिक डॉ. गुरुदास नाटेकर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डी. भट व सोनीया शिरोडकर यांनी केले तर अनिल शर्मा यांनी आभार मानले