म्हापसा दि. 29 ( प्रतिनिधी )
हणजूण लायन्स क्लब तर्फे हणजूण कायसूव जैव विविधता व्यवस्थापन समिती च्या सहकार्याने वागातोर येथील डोंगर माथ्यावर वनमहोत्सवाचा भाग म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला.
यावेळी लायन्स क्लब चे जुलीयन डिसोझा, महादेव कांबळी, मोरजकर व इतर पदाधिकारी तसेच जैव विविधता समितीचे अध्यक्ष मायकल डिसोझा, सदस्य रमेश नाईक, मारिओ फर्नांडिस आदी उपस्थित होते. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे कारण बांधकामे करताना मोठ्याप्रमाणात झाडांची कत्तल केली केली जाते असे प्रतिपादन लायन्स क्लब चे सचिव जुलीयन डिसोझा यांनी केले.
यावेळी बोलताना हणजूण कायसूव जैव विविधता समितीचे अध्यक्ष मायकल डिसोझा यांनी सांगितले की यंदाच्या वनमहोत्सवाचा भाग म्हणून समितीने हणजूण लायन्स क्लब बरोबरच हणजूण येथील सिक्रेट हार्टऑफ जिजस हायस्कुल, वागातोर येथील सेंट मायकल हायस्कुल, हणजूण येथील लिटिल एंजल हायस्कुल, वागातोर येथील सेंट अँथोनी चर्च यांना फळ झाडांची रोपटी वितरित केली तसेच काही ग्रामस्थांना भाजीपाल्याच्या बिया किचन गार्डन करण्याकरिता देण्यात आल्या असे डिसोझा यांनी सांगितले.