जीएफडीसीचा दहावा वर्धापनदिन साजरा

.

जीएफडीसीचा दहावा वर्धापनदिन साजरा
पणजी ः गोवा फुटबॉल विकास परिषदेचा दहावा वर्धापनदिन शुक्रवारी बांबोळी येथील गोवा ऍथलेटिक स्टेडियमवर थाटात साजरा करण्यात आला. यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे, जीएफडीसीचे अध्यक्ष पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर, क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाचे संचालक तथा गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अजय गावडे, जीएफडीसीचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत आजगावकर उपस्थित होते. या निमित्त डीएसवायए-साग स्टाफ व जीएफडीसी यांच्यात मित्रत्वाचा सामना झाला. यात क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनीदेखील सहभाग नोंदविला होता. दुर्देवाने दुखापतीमुळे त्यांना सामना अर्ध्यावरच सोडावा लागला. त्यामुळे समारोपाच्या कार्यक्रमात त्यांना उपस्थित राहता आले नाही. हा सामना डीएसवायए-साग संघाने २-० असा जिंकला.
यावेळी बोलताना ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी जीएफडीसी, डीएसवायए, साग व जीएफए यांनी गोव्यातील मुलांना भविष्यातील फुटबॉल सुपरस्टार करण्याच्या एकमेव ध्येयाने झटण्याची गरज व्यक्त केली. अध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतर केलेल्या सहकायाबद्दल तसेच दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांनी जीएफडीसीच्या सर्व सदस्यांचे यावेळी आभार मानले. सॅफ अंडर २० स्पर्धेसाठी निवड झालेल्या हर्ष पात्रे याचे तसेच बंगळुरू एफसीने निवडलेल्या क्लेरन्स व फेलिक्सन यांचे अभिनंदन देखील त्यांनी केले. उपाध्यक्ष आजगावकर यांनी माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी तसेच जीएफडीसीने स्थापनेवेळी समोर ठेवलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी भविष्यातही असेच काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना अजय गावडे यांनी जीएफडीसीने हा मैलाचा दगड पार केल्याबद्दल आभार मानले. गोव्यात फुटबॉलच्या विकासासाठी सर्वतोपरी साहाय्य करणार असल्याचे सांगतानात त्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. जीएफडीसीने राज्यात एकूण चाळीस केंद्रे असून या चाळीसही केंद्रांमध्ये जीएफडीसीचा १०वा वर्धापनदिन साजरा करण्यात करण्याचे निर्देष देण्यात आले आहेत.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar