केरी न्यू इंग्लिश हायस्कुल हे शिक्षण क्षेत्रातील भूषण:
माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप
हरमल प्रतिनिधी
पेडणे तालुक्यातील केरी गांवचे भूषण असलेली न्यू इंग्लिश हायस्कुल एक जिताजागता इतिहास असून 50 वर्षांपूर्वी ह्या संस्थेचा पाया रोवला त्या संस्थेने नूतनीकरणाचा संकल्प सोडल्याने,संस्थेच्या माजी विध्यार्थी, समाजकारण्यांनी व ग्रामस्थांनी योगदान देणे आवश्यक असल्याचे मत संस्थेचे आजीवन सदस्य रमाकांत खलप यांनी व्यक्त केले.
केरी तेरेखोल परिसर विकास कल्याण व शैक्षणिक संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.ह्या गावांचा इतिहास बक्षी जिवबादादा केरकर पासून सुरू होईल.त्याकाळी मराठी शाळांची व नंतर इंग्रजी शाळांची गरज होती.त्यावेळेस आपण ह्या भागातून आमदार म्हणून निवडून आलो होतो व शाळेच्या इमारतीसाठी जागेच्या बाबतीत आपला सहभाग होता,हे संस्थेच्या अध्यक्ष नारायण सोपटे केरकर यांनी सांगितले आहे.परंतु पन्नाशीच्या ह्या संस्थेने नवीन संकल्प केला असल्याने आपले यथोचित योगदान असेलच,शिवाय ह्या शाळेचे माजी विध्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन सुसंस्कारित नागरिक बनले त्यांनी व गांवातील सहृदयी दात्यांनी संचालक मंडळाच्या नवीन संकल्पास साथ दयावी व सुसज्जतेकडे वाटचाल करावी असे रमाकांत खलप यानी सांगितले.
ह्या संस्थेचा आजीवन सदस्य देशाचा कायदामंत्री झाला त्यावेळी ह्या शाळेच्या प्रांगणातील कुंपण व अन्य समस्या सोडविल्या होत्या.अशा ह्या गावांतील युवक देशाच्या पंतप्रधानपदी होवो अशा शुभेच्छा खलप यांनी भाषणातून व्यक्त केल्या.आपल्या समाजकारणाला पन्नास वर्षे पूर्ण झाली व अमृतमहोत्सवी समारंभाला येण्याचे भाग्य आपणास लाभो,असे खलप यांनी सांगितले.ह्यावेळी संस्थेचे प्रथम चेअरमन डॉ अनंत नाईक यांनी स्थापनेवेळाच्या स्मृतीना उजाळा दिला.गांवातील बापू कुबल व अनेकांनी ह्या गांवातील बापू कुबल व अनेकांनी ह्या शाळेच्या उद्धारासाठी प्रयत्न केले.आरोग्य खात्यात संचालकपदापासून ते निवृत्त होईपर्यंत जे कष्ट व कर्तव्य केले त्या शाळेच्या उद्धारासाठी गांवातील लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन डॉ नाईक यांनी केले.
चेअरमन नारायण सोपटे केरकर—
ह्या शाळेचा मागोवा घेतला व शाळा प्रकल्पाच्या नूतनीकरणसाठी किमान दीड कोटींची गरज असल्याचे सांगितले.अद्यापपर्यंत चार पाच जणांनी दहा लाख रुपये देण्याची इच्छा जाहीर केली असून प्रारंभापासून प्रत्येक किलो धान्यमागे दोन पैसे गोळा केले होते अश्या संस्थेसाठी गांवातील दात्यांनी पुढे यावे.प्रत्येक देणगीदार व त्यांच्या इस्चेनुसार त्यांच्या प्रिय व्यक्तींची नांवे नोंदवली जाईल.केरीचे ग्रामदेव मंदिर जसे गावातील लोकांच्या सहकार्यानेपूर्ण झाले तसेच संस्थेच्या संचालक मंडळचा कारभार पारदर्शक असून विश्वासाने संस्थेच्या भरभराटीला सहकार्य करावे असे चेअरमन नारायण सोपटे केरकर यांनी आवाहन केले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल गडेकर,खजिनदार ब्रजेश केरकर,सदस्य गणू वस्त,मिलिंद केरकर, डायगो डिसौझा, उमेश केरकर,देवेंद्र केरकर, शैलेंद्र कुबल,सुरेश नाईक, मिलिंद तळकर,विनायक गाड, विनोद नाईक,पालक शिक्षक संघाचे गंगाराम मठकर,व्यवस्थापक तातोबा तळकर, मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर उपस्थित होते. शिक्षिका शर्मिला नाईक यांनी मान्यवरांचा परिचय व नम्रता आजगांवकर, दिव्या पिंगुळकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.प्रारंभी खलप यांच्याहस्ते दीपप्रज्वलन केले. विध्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.यावेळी विध्यार्थी मंडळाचा शपथविधी झाला त्या समारंभास प्रमुख पाहुणे खलप यांनी शपथ दिली.शपथविधी सोहळ्याचे निवेदन शिक्षिका नंदिनी कोरकणकर हिने केले.सोहळ्याचे सुत्रनिवेदन शिक्षक गुरुप्रसाद तांडेल तर व्यवस्थापक तातोबा तळकर यांनी आभार मानले.
फोटो
केरी पेडणे येथे न्यू इंग्लिश हायस्कुलच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या उदघाटन प्रसंगी ऍड रमाकांत खलप व मान्यवर.