शाळेत लोकमान्य टिळक अवतरले
सरकारी उच्च प्राथमिक विद्यालय मुरमुसे तुये येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका सुनिता परळकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण केला.
इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील प्रसंगावर नाटक सादर केले. विद्यार्थिनी सान्वी माणगावकर यांनी भाषण केले. तसेच शिक्षिका मंजुषा नाईक यांनी लोकमान्य टिळक यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांसठी प्रश्नमंजुषा ठेवण्यात आली होती.
लोकमान्य टिळक यांची वेशभूषा साईदीप कांबळी यांनी केली होती.
शेवटी शिक्षिका स्नेहा नारुलकर यांनी सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका मानसी कशाळकर, शिक्षक दिलखुष कांबळी व नारायण सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.