खडतर परिश्रमाने यश साध्य होते – नंदकुमार परब .

.

खडतर परिश्रमाने यश साध्य होते – नंदकुमार परब .
खडतर परिश्रमाने यश साध्य होते त्यामुळे विद्यार्थ्यांनी परिश्रमाची कास कधीही सोडू नये, असे उद्गार वन अधिकारी श्री नंदकुमार परब यांनी काढले. ते हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात खास निमंत्रित या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे चेअरमन व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, प्रमुख पाहुणे डॉ.बाबू केरकर, हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या व्यवस्थापिका व हरमल पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता पार्सेकर, प्राचार्य गोविंदराज देसाई, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष जयराम परब, हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे पदाधिकारी गंगाराम गडेकर व सूर्यकांत नाईक हजर होते.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभिनंदन गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.प्राचार्य गोविंदराज देसाई यांनी सर्वांचे स्वागत केले. मान्यवरांचा परिचय शामला नाईक रेडकर यांनी करून दिला तर सिद्धी नाईक व मुक्ता सोपटे यांनी त्यांना पुष्पगुच्छ  यानंतर यावर्षी गोवा शालांत मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत विशेष श्रेणी पटकावलेल्या 66 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शांभवी नाईक यांनी मुक्ता सोपटे, सिध्दी नाईक, दीपिका नाईक, नम्रता नाईक, वामन हरमलकर व सनील पार्सेकर यांच्या सहाय्याने सत्कार सोहळ्याची सूत्रे यशस्वीपणे सांभाळली. कु. सेजल नाईक व रिचा गावडे यांनी सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे डॉ. बाबू केरकर यांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या चाललेल्या प्रयत्नाबद्दल तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या नवीन सुविधांबद्दल गौरवोद्गार काढले व विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याचा सल्ला दिला.
कोविड काळात सर्व खबरदारी घेऊन जे वर्ग घेतले त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत झाला. त्याचेच फलित म्हणून अनेक विद्यार्थी विशेष श्रेणीत येऊ शकले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडेही तेवढेच लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले. त्यांच्या हस्ते खास निमंत्रित नंदकुमार परब व प्रमुख पाहुणे डॉ.बाबू केरकर यांना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आल कार्यक्रमाच्या शेवटी केशव नाईक यांनी आभार प्रकटन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक किंजवडेकर यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीत शिक्षक मकरंद परब, रोहन कदम, दशरथ नाईक यांचे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे विशेष सहाय्य लाभले.
3/3

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar