वळपे पेडणे येथील विकास हायस्कूलमध्ये पालक शिक्षक संघटनेची बैठक

.

वळपे पेडणे येथील विकास हायस्कूलमध्ये पालक शिक्षक संघटनेची बैठक नुकतेच संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष उल्हास देवलकर ,खजिनदार गुरुप्रसाद जोशी, मुख्याध्यापक नागेश गोसावी ,व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष मदन शिक्षक, प्रतिनिधी रत्नाकर उपस्थित होते.
सर्वप्रथम गाणंरुंद गटाने सरस्वती स्तवन व स्वागत गीताने सर्वांचे स्वागत केले वरद जोशी यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यंदाच्या शालांत मंडळाचे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाचे उत्तीर्ण झालेले राज कोळेकर ,निलक्षी राऊळ, गुंशन मालपेकर व मंजुषा नाईक या विद्यार्थ्यांना भेटवस्ते देऊन गौरवण्यात आले.
पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष उल्हास देऊलकर पालकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की पालक आणि मुलांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे त्यांना वेळ पत्र करून त्यानुसार अभ्यासात बसावे जर पालकाने लक्ष घातले तर विकास हायस्कूलचा या वाटवृक्षाचा विस्तार होईल.
आजची मुले भ्रमणध्वनीच्या बाबतीत त्यांना आमच्यापेक्षा खूप काही कळतं .त्यांचा योग्य तो उपयोग करून अभ्यासाच्या बाबतीत मुलांची सेवा करण्याची संधी गमवू नका. त्यांना आताच योग्य वळण लावा व त्यांच्या जीवनाच्या त्यांना वाटा दाखवा असे मुख्याध्यापक नागेश गोसावी म्हणाले.
यावेळी मदन परब यानेही आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर नवीन कार्यकारणी निवडण्याची निवडण्यात आली निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. पालक आणि उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन मुख्याध्यापक नागेश गोसावी यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पलक कर्मळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शारदा परब यांनी केले शेवटी राष्ट्रगीताने बैठकीची सांगता करण्यात आली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar