इलेक्ट्रॉनिक लॉक्स उत्पादन सुविधांसह विस्तार – गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्स

.

इलेक्ट्रॉनिक लॉक्स उत्पादन सुविधांसह विस्तार – गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्स

चार उत्पादन कारखाने आणि एकूण १०० कोटी रुपयांची विस्तार योजना तसेच पुढील तीन वर्षांत ५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह गोवा हे एक महत्त्वाचे उत्पादन केंद्र आहे

गोवा, २ ऑगस्ट २०२२ – गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्स (जीएलएएफएस) हे गोदरेज समूह या प्रमुख कंपनीच्या गोदरेज अँड बॉइसचे प्रसिद्ध व्यावसायिक युनिट असून या युनिटने नुकतीच १२५ वर्ष पूर्ण केली. गृहसुरक्षेला चालना देणाऱ्या आणि कित्येकांची पसंतीची कंपनी असलेल्या गोदरेज लॉक्सद्वारे बऱ्याच दशकांपासून सुरक्षित आणि दर्जेदार लॉकिंग सुविधा दिल्या जात आहेत.

२७ वर्षांपासून हा ब्रँड गोव्याच्या वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. १९९८ मध्ये मडकई येथे कामाला सुरुवात केल्यानंतर कंपनीने सुरू केलेल्या चार कार्यान्वित उत्पादन कारखान्यांत नाविन्यपूर्ण लॉकिंग उपकरणांचे उत्पादन केले जाते. ७ एकरांवर पसरलेल्या मडकईमध्ये ८५०- ९०० कर्मचारी कार्यरत असून ते केंद्र जगभरात विक्री केल्या जाणाऱ्या ६५० एसकेयूजचे (उत्पादन) प्रमुख स्त्रोत आहे. या चार उत्पादन केंद्रांची एकूण उत्पादन क्षमता प्रती महिना १० लाख युनिट्स आहे. एकूण १०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह जीएलएएफएस पुढील तीन वर्षांत ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यामागे डिजिटल लॉक्स, पॅडलॉक्स, मॉर्टिज लॉक्स आणि डोअर क्लोजर्स यांचे उत्पादन विस्तारण्याचे उद्दिष्ट आहे.

ब्रँडच्या गोव्यातील सद्य उत्पादन श्रेणीमध्ये पॅडलॉक्स, रिम लॉक्स आणि फर्निचर लॉक्स तसेच प्रेस आणि डाय कास्टिंग टुल्सचे डिझायनिंग व उत्पादन यांचा समावेश आहे. ब्रँड ऑटोमेशन क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत असून दर्जेदार व्यवस्थापन यंत्रणेचा वापर करून धोरणात्मक उपक्रम कंपनीतर्फे राबवले जात आहे. कंपनीने एलसीए आणि ट्रान्सफर यंत्रणेचा वापर करून जुळणी यंत्रणेचाही विकास केला आहे. बदलत्या प्रवाहाबरोबर राहाण्यासाठी कंपनीने पीएमएस, सीएमएस, क्यूएमएसचा अवलंब करत डिजिटायझेशनचा स्वीकार केला आहे. उत्पादन गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रँडने २५ प्रमुख पुरवठादारांशी भागिदारी केली असून ते ऐनवेळेस उद्भवणाऱ्या गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

गोव्यातील व्यावसायिक विस्ताराविषयी गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्सचे व्यावसायिक प्रमुख श्री. श्याम मोटवानी म्हणाले, ‘गोदरेज लॉक्स गेल्या २७ वर्षांपासून गोव्यात कार्यरत आहे आणि आमच्या महत्त्वाच्या उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. इथे आम्ही आमच्या उत्पादन सुविधांच्या एकत्रीकरणावर आणि लॉकिंग उपकरणांशी संबंधित बदलणाऱ्या जागतिक गरजा पूर्ण करण्यावर प्रामुख्याने भर देत आहोत. या विस्तार योजनेमुळे गोव्याचे धोरणात्मक महत्त्व वाढेल आणि स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती करणे शक्य होईल.’

कंपनीद्वारे या भागात सीएसआर उपक्रमही राबवले जात आहेत, ज्याचा संपूर्ण समाजाला लाभ होत आहे. शालेय इमारतीची उभारणी आणि मडकईतील सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेसाठी योगदान देत ब्रँडने येथील समाजाच्या कल्याणासाठी भरीव योगदान दिले आहे.

ब्रँड गोदरेज अँड बॉइसतर्फे चालवल्या जाणाऱ्या ग्रीनर इंडिया इनिशिएटिव्हचाही एक भाग असून त्याशिवाय पाणी आणि उर्जेचे संवर्धन तसेच हानीकारक कचरा कमी करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी कंपनीतर्फे योगदान दिले जाते. हरित प्लेटिंग रसायन निर्मिती करणारे ही देशातील पहिली उत्पादन कंपनी आहे.

कंपनीद्वारे आता आर्किटेक्चरल फिटिंग्ज विभागातील निवडीचा विस्तार करण्यावर आणि भारतीय घरांसाठी आधुनिक डिझाइन्स बनवण्यावर भर दिला जात आहे. उदा. स्मार्ट किचन ड्रॉवर्स अँड ऑर्गनायझर्स (एसकेआयडीओ) ही भारतीय घरांसाठी खास तयार करण्यात आलेले ऑर्गनायझर्स, ड्रॉवर्स, कॉर्नर सोल्यूशन्स, अंडर सिंक सोल्यूशन्स, धान्य साठवण्यासाठीच्या सुविधांची श्रेणी आहे. भारतीय ग्राहकाच्या गरजा लक्षात घेऊन त्याला खास सुविधा देण्याच्या हेतूने स्किडो तयार करण्यात आले आहे. भविष्यवेधी आणि गरजेनुसार सुविधा तयार करणे हे जीएलएएफएसचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

गोदरेज लॉक्सतर्फे सध्या २४ देशांत लॉकिंग सुविधांची निर्यात केली जात असून त्यात आशिया, आफ्रिका, अमेरिका व मध्य पूर्व देशांचा समावेश आहे. कंपनीला परकीय बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढवायचा आहे तसेच या बाजारपेठांमधील आर्किटेक्चरल हार्डवेयर आणि किचन यंत्रणा क्षेत्रात प्रवेश करायचा आहे.
***

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें